२०१९ च्या तुलनेत यावर्षी मुंबईत कार आणि एसयूव्हीच्या नोंदणीत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक कार नोंदणी बेट शहरात (१८ हजार १५) आणि सर्वाधिक दुचाकी नोंदणी पूर्व उपनगरात (४० हजार एकशे ६४ ) झाली. तथापि, २०१९ च्या प्री-कोविड वर्षात लोकांनी आतापेक्षा जास्त ‘दुचाकी’ खरेदी केल्या असेही कळण्यात आले आहे.
मुंबईत दररोज १८८ जणांची नोंदणी होत आहे. यामुळे आणखी गर्दी, जास्त ताणलेले रस्ते आणि प्रदूषण वाढते . चिंताजनकपणे त्यांनी असे ही सांगितले की, मुंबईचा वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अलीकडे दिल्लीपेक्षाही वाईट होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्याची वेळ आली आहे.
हे ही वाचा :
‘आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार’
राज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका
बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं
घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार
तज्ज्ञांनी सांगितले की, “ऑटोमोबाईल कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अपग्रेड केलेल्या मॉडेल्ससह नवीन वाहने लाँच केली आहेत. २०२१ आणि २०२२ मध्ये एसयूव्हीवी आणि इलेक्ट्रिक कारचीही मोठी विक्री झाली आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की शहरातील कारच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मग आता वाढ झाल्यावर प्रदूषण ही वाढेल त्याच काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला आहे.
परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की २०२२ च्या १ जानेवारी ते १४ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रात कार नोंदणीमध्ये ४४ टक्के वाढ झाली आहे. “आता २०२३-२४ मध्ये बेस्टचा ताफा ३ हजार सहाशे एकोणतीस वरून सात हजार बसेसपर्यंत वाढवला जाईल. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या ४५ लाखांपर्यंत वाढू शकेल “, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.