29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषभाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीचा अपघात

भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीचा अपघात

रूबी रुग्णालयात उपचार सुरु

Google News Follow

Related

भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा शनिवारी पहाटे अपघात झाला आहे. या भीषण अपघातात गोरे यांच्यासह त्यांचे चालक आणि दोन गार्ड गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये गोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण येथील स्मशानभूमीजवळ हा अपघात पहाटे ३.३० वाजता झाला. गोरे हे आमदार पुण्याहून दहिवडी या त्यांच्या गावी जात होते. जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर एसयूव्ही पुलावरून थेट तीस फूट खाली दरीत कोसळली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाला आहे. या घटनेत जयकुमार गोरे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली आहे.

जयकुमार यांच्यासह कारमधील आणखी तीन जण गंभीर जखमी झाले. इतर जखमींना बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेची वेळ असल्याने चालकाचे डोळे मिचकावले असावेत, त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि फॉर्च्युन पुलाची रेलिंग तोडून ३० फूट खाली पडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु गोरे यांनी २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलगपणे जिल्ह्यात माणची जागा जिंकली आहे. ते २००९ मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

हे ही वाचा : 

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदाराने केली सावरकरांच्या स्मारकासाठी मागणी

क्रांतिकारक पाऊल; सौदी अरेबियात परिक्षा केंद्रात हिजाब बंदी

संजय राऊत सांगा त्या वाटणीचं काय?

जयकुमार गोरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. नुकतंच गोरे यांना भाजपाने सातारा जिल्हाध्यक्ष बनवून त्यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा