वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला जीआर रद्द!

वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही यावर भाजप ठाम

वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला जीआर रद्द!

राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये निधी दिल्याच्या बातम्या समोर येत होत्या. यासंदर्भात तसा शासनाचा जीआर देखील समोर आला होता. यावरून विरोधकांनी भाजपा-महायुतीला लक्ष करत होते. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे विरोधकांनी म्हटले. याच दरम्यान, भाजपने ट्वीटकरत वक्फ बोर्डाच्या निधीचा जीआर रद्द केल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपा-महायुती बद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे.

भाजपा महाराष्ट्रने ट्वीटकरत म्हटले, वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला GR रद्द. भाजपा-महायुती सरकारने महाराष्ट्र वक्फ बोर्डाला तातडीने १० कोटींचा निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता. मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही यावर भाजप ठाम आहे आणि राहणार, असे भाजपाने म्हटले आहे.

महायुती सरकारकडून वक्फ बोर्डासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीचा शासन निर्णय जाहीर करताच भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या निर्णयाला विरोध केला. यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले, वफ्क बोर्डाला निधी दिल्याची बातमी सध्या सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार आहे व या सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. फक्त तातडीने काही आपत्कालीन निर्णय करावे लागले तरच करता येतात. निधी बाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवरून घेतला गेला असे दिसते त्यामुळं प्रशासन आपल्या निर्णयात दुरुस्ती करेल अशी आशा आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले. दरम्यान, हा जीआर आता रद्द करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

गोंदिया- कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा अपघात; आठ जणांचा मृत्यू

शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!

संभल मशीद प्रकरण: कनिष्ठ न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी कोणतीही कारवाई करू नये!

हिंदू असल्याचे भासवत कासीमने केले लग्न, आता धर्मपरिवर्तनासाठी दबाव!

 

पावशेर, शेर आणि शेरनी ! Mahesh Vichare | Sanjay Raut | Priyanka Gandhi Vadra

 

Exit mobile version