विकास प्रकल्प रद्द करणे हीच उद्धव ठाकरेंची खासियत !

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

विकास प्रकल्प रद्द करणे हीच उद्धव ठाकरेंची खासियत !

सत्तेवर आल्यानंतर धारावीचे टेंडर रद्द करू आणि धारावीच्या हितासाठी आम्ही नवीन टेंडर काढू. तसेच धारावी अदानीच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी आज (२० जुलै) पत्रकार परिषद घेत धारावी प्रकल्पाला विरोध करत सरकारवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. विकासाच्या प्रकल्पाला विरोध करणं ही उद्धव ठाकरेंची खासियत असून मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर पाठवून आपल्या बिल्डर मित्राच्या घशात मुंबई घालायची, हे तुमचे कुटील कारस्थान आहे, अशी टीका आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

आमदार भातखळकर म्हणाले की, धारावी पुनर्वसन प्रकल्प सत्तेवर आलो तर रद्द करू, या उद्धव ठाकरेंच्या स्टेटमेंटमध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काय नाही. सर्व विकासाचे प्रकल्प रद्द करणं आणि विरोध करणं ही उद्धव ठाकरेंची खासियत आहे. त्यामध्ये समृद्धी महामार्ग, धारावी पुनर्वसन प्रकल्प, मेट्रो प्रोजेक्ट, नानार प्रकल्प, अथवा बारसूचा रिफायनरी प्रकल्प असेल. जिथे-जिथे लोकांचं विशेषतः मराठी माणसांचे भलं होतंय तिथे उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखते.

हे ही वाचा..

जरांगेंचा भंपकपणा उघड करून त्यांच्यावरच भूत नक्कीच उतरवू !

गृहमंत्री अमित शहांच्या सुरक्षेत कुचराई, दोन तरुणांनी केला ताफ्याचा पाठलाग !

न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद !

इलॉन मस्क यांच्याकडून मोदींना कोटी कोटी शुभेच्छा…१० कोटी फॉलोअर झाल्याबद्दल अभिनंदन !

ते पुढे म्हणाले, उद्धवजी मुंबई शहरातला मूळ मुंबईकर या मुंबईत राहण्याकरिता आणि त्याला चांगले जीवनमान देण्याकरिता धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आहे. तुमचा बीबीडी चाळीच्या पुनर्वसनाला विरोध होता आणि धारावीच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाला देखील विरोध आहे. कारण मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर पाठवायचं आणि आपल्या बिल्डर मित्राच्या घशात मुंबई घालायची, हे तुमचे कुटील कारस्थान आहे. या धारावी पुनर्वसन प्रकल्पाकरिता रेल्वेने आपली जागा दिली. त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्प होणारच. कारण मूळ मुंबईकर या मुंबईत राहून चांगल्या स्थितीमध्ये जगेल हे नक्की आहे, हा प्रकल्प पूर्णत्वाला जाणार म्हणजे जाणार, असे ठाम मत आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलं.

Exit mobile version