मुंबईतील रस्ते कामांसाठी काढण्यात आलेल्या कमी खर्चाच्या निविदा तात्काळ रद्द करून फेरनिविदा काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच आता हा मुद्दा चांगलाच तापणार आहे. या रस्ते कामांवरून शिवसेना – भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली आहे.
मुंबईकरांना खड्डेमुक्त व चांगले रस्ते मिळण्यासाठी वजा ३० टक्के रकमेच्या निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. मात्र कमी खर्चाच्या कंत्राटामुळे मुंबईतील रस्ता कामे चांगल्या दर्जाची होणार का यावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे या निविदा रद्द करून फेर निविदा मागवा, असा हरकतीचा मुद्दा मांडून शुक्रवारी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीचे लक्ष वेधले.गेल्या २५ वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मुंबई महापालिका हद्दीतील रस्त्याची दुर्दशा रस्त्यावरील आणि रस्त्याच्या साईड स्ट्रीप वरील खड्डे याबाबत दरवेळी प्रश्न चिन्ह उभारले जाते. महापालिकेने वर्ष १९९७ ते वर्ष २०२१ पर्यंत रु. २१००० करोड खर्च करूनही मुंबईकरांना महापालिका खड्डे मुक्त रस्ते देऊ शकलेली नाही हे विदारक सत्य आहे. महापालिका हद्दीतील अदमासे १९५० किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे ७५० किलोमीटर रस्त्यांचे म्हणजे ४०% रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालेले आहे. उर्वरित ६०% रस्त्यांपैकी निम्म्या रस्त्यांचे काम गेल्या ५ वर्षात केल्यामुळे हे रस्ते दोषदायित्व कालावधीत (Defect Liability Period) मध्ये आहेत. दोषदायित्व कालावधीत या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती रस्त्याचे काम करणाऱ्या मूळ कंत्राटदारानेच करायची आहे.
विविध उपयोगिता सेवा (Utilities) यांजकडून खणलेले चर बुजविण्यासाठी आपण दुप्पट / तिप्पट दराने शुल्क आकारतो. हे चर भरण्यासाठी दरवर्षी रु. ३५० ते ४०० कोटी कंत्राटदाराच्या घशात घातले जातात. पण चर नीट न भरल्याने पुन्हा खड्डे आणि खड्डे भरण्यासाठी पुन्हा कंत्राट हे अर्थचक्र गेले २५ वर्षे असेच सुरु आहे. अर्थात उर्वरित केवळ ३०% रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात प्रत्येकी रु. २ कोटी म्हणजे एकूण मुंबईसाठी रु. ४८ कोटी एवढी तरतूद या वर्षी करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त दरवर्षी रस्त्यांची कामांसाठी तसेच रस्त्यालगतच्या लवचिक भागाच्या पट्ट्याच्या सुधारणेसाठी रु. १२०० ते रु. १५०० कोटींची कामांच्या निविदा काढल्या जातात. अशी महापालिकेच्या तिजोरीतून निधीची कोटीच्या कोटी उड्डाणे केल्यानंतरही रस्त्यावर खड्डे कायम आहेत. दोन दिवसावर गणेश विसर्जन आले आहे परंतु मुंबईतील हमरस्त्यावरही अद्याप मोठे मोठे खड्डे बुजविलेले नाहीत.
मुंबई महापालिका हद्दीतील रस्त्याची दुर्दशा रस्त्यावरील आणि रस्त्याच्या साईड स्ट्रीपवरील खड्डे याबाबत दरवेळी प्रश्न चिन्ह उभारले जाते. महापालिकेने वर्ष १९९७ ते वर्ष २०२१ पर्यंत २१००० कोटी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना महापालिका खड्डेमुक्त रस्ते देऊ शकलेली नाही हे विदारक सत्य आहे. महापालिका हद्दीतील अंदाजे १९५० किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे ७५० किलोमीटर रस्त्यांचे म्हणजे ४० टक्के रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झालेले आहे. उर्वरित ६० टक्के रस्त्यांपैकी निम्म्या रस्त्यांचे काम गेल्या ५ वर्षात केल्यामुळे हे रस्ते दोषदायित्व कालावधीमध्ये आहेत.
हे ही वाचा:
मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे
कांजूरमार्गमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पश्चिम आणि मध्य रेल्वेने प्रवास करतायत ४० लाख लोक
दोषदायित्व कालावधीत या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती रस्त्याचे काम करणाऱ्या मूळ कंत्राटदारानेच करायची आहे. विविध उपयोगिता सेवा यांच्याकडून खणलेल्या चरी बुजविण्यासाठी आपण दुप्पट, तिप्पट दराने शुल्क आकारतो. या चर भरण्यासाठी दरवर्षी ३५० ते ४०० कोटी कंत्राटदाराच्या घशात घातले जातात. पण चर नीट न भरल्याने पुन्हा खड्डे आणि खड्डे भरण्यासाठी पुन्हा कंत्राट हे अर्थचक्र गेले २५ वर्षे असेच सुरु आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.