कॅनडातील हिंदू मंदिर हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक!

खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा जवळचा साथीदार असल्याची माहिती 

कॅनडातील हिंदू मंदिर हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक!

गेल्या आठवड्यात ब्रॅम्प्टन येथील एका मंदिरात हिंदू भाविकांवर खलिस्तानी समर्थकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी (१० नोव्हेंबर) सांगितले. इंद्रजीत गोसल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती आहे.

हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला इंद्रजीत गोसल हा चौथा आरोपी असून यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती. ८ नोव्हेंबर रोजी इंद्रजीत गोसलला अटक करण्यात आली. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली असून पुढील तारखेस न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आरोपी इंद्रजीत गोसल हा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा जवळचा साथीदार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी कॅनडा पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : 

श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू

भिवंडीत ठाकरेंना धक्का, माजी आमदार रुपेश म्हात्रे शिंदे गटात सामील!

एकगठ्ठा मतांचा जुगाड, तरीही पवार, पटोले धास्तावलेत का?

हिंदू महिलेचे तुकडे करणाऱ्या गुलामुद्दीनला मुंबईत अटक

दरम्यान, ब्रॅम्प्टन शहरातील हिंदू सभा मंदिरात ४ नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करण्यासाठी जमलेल्या भाविकांवर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी खलिस्तानींना रोखण्याऐवजी पीडित हिंदूंवर लाठीमार करत त्यांना अटक केली होती. विशेष म्हणजे, हिंदू मंदिरावर हल्ला झाला तिथे एक पोलिसच खलिस्तानी मोर्चात सामील झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर संपूर्ण भारतासह अनेक देशांनी निषेध केला होता.

Exit mobile version