कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची लोकप्रियता कमी होत असल्याचे दिसून आले आहे.इप्सॉसकडून नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले, सर्वेक्षणानुसार जर आज निवडणूका झाल्या तर जस्टिन ट्रुडो याना ३० टक्के मत मिळू शकतील व कॅनेडियन विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे याना ४० टक्के मत मिळेल असे सर्वेक्षणात म्हटले आहे.त्यामुळे पॉइलीव्हर याना लोकांची पसंती असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या आरोपामुळे चर्चेत असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची मतदारांमधील लोकप्रियता कमी होत असल्याचे दिसून आले आहे, असे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे.अहवालात असे दिसून आले आहे की, जर आज निवडणूका झाल्या तर पॉइलिव्ह्रच्या कंझर्व्हेटिव्हला एकूण मतांच्या ३९ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. तर पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पार्टीला केवळ ३० टक्के मते मिळतील.त्यामुळे ट्रुडोच्या पार्टीला डावलून कंझर्व्हेटिव्ह पार्टी बहुमताचे सरकार स्थापन करेल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.तसेच कॅनडामध्ये २०२५ च्या उत्तरार्धात निवडणूक होणार आहे.
जुलै महिन्यात केलेल्या वेग- वेगळ्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ट्रूडो हे ५० वर्षांहून अधिक काळातील सर्वात वाईट पंतप्रधान होते. सिटीवि रिपोर्टनुसार, १९६८ ते १९७९ आणि १९८० ते १९८४ पर्यंत पंतप्रधान म्हणून काम करणारे त्यांचे वडील पियरे ट्रूडो हे कॅनेडियन मतदारांमध्ये लोकप्रिय होते.
हे ही वाचा:
राहुल गांधींचे परदेशात जाऊन भारतावर टीका करणे सुरूच..
इंडोनेशियाच्या शेल इको स्पर्धेत संघवी कॉलेजचे प्रतिनिधित्व करणार चिपळूणचा सुपुत्र
गॉडमदर लेडी डॉनला दरोड्याप्रकरणी मालाडमध्ये अटक
शरयू एक्स्प्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणारा चकमकीत ठार !
सध्या असे दिसून आले की, कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेतृत्व करणारे पियरे पॉइलिव्हरे हे जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पार्टीपेक्षा आघाडीवर आहेत.तसेच वैयक्तिकरित्या पोलिएव्हरे हे ट्रुडोपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
ट्रुडो यांच्यावर खलिस्तान चळवळीबाबत आरोपही करण्यात आले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दंगली घडवणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याबद्दल कॅनडातील लोक अधीर झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. लिबरल सध्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टी (एनडीपी) सोबत सरकारचे नेतृत्व करत आहेत. जगमीत सिंग एनडीपीचे नेतृत्व करत आहेत. हा खलिस्तानचा सहानुभूतीदार आहे. एनडीपीने पुढील निवडणुकीपर्यंत सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. खलिस्तान समर्थकांसह सरकार चालवल्याबद्दल टीकेचा वर्षाव होत आहे. शिवाय, आता भारतासोबत याच विषयावर वाद सुरू आहे. पण ट्रुडो संपूर्णपणे भारतावर दोष टाकत आहेत. निज्जर यांच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा निराधार आरोप केल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी या सर्वेक्षणाचा खुलासा महत्त्वाचा ठरला आहे.