भारत कॅनडा ताणलेल्या संबंधांमुळे शीख सिनेट उमेदवार सरबजीत पायउतार !

जस्टिन ट्रुडो यांनी २०१६ रोजी केली होती नियुक्ती

भारत कॅनडा ताणलेल्या संबंधांमुळे शीख सिनेट उमेदवार सरबजीत पायउतार !

भारत आणि कॅनडामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाचे सरबजीत सिंग मारवाह यांनी कॅनडाच्या सिनेटचा राजीनामा दिला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांची सिनेटवर नियुक्ती केली होती.२०१६ रोजी त्यांची नियुक्ती केली होती त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता.

कॅनडा आणि भारत यांच्यातील तणावपूर्ण वादात भारतीय वंशाच्या सरबजीत सिंग मारवाहने कॅनडाच्या सिनेटचा राजीनामा दिला आहे. मारवाह हे कॅनडाच्या सिनेटमध्ये नियुक्त झालेले पहिले शीख होते आणि त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांची सिनेटवर नियुक्ती केली होती.मारवाह यांच्या राजीनाम्याने ट्रुडो याना चांगलाच धक्का दिला आहे.

हे ही वाचा:

‘राष्ट्रहिताला प्राधान्य’ देणाऱ्या तरुण पिढीचा विजय, अमित शहा !

खलिस्तानी दहशतवादी निज्जरचे पंजाबमधील घर जप्त होणार

सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट ५ कामगार ठार, अनेक जखमी

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात येण्याला पाकिस्तान संघाला अद्याप हिरवा झेंडा नाही

कोण आहे सरबजीत सिंग मारवाह
सरबजीत सिंग मारवाह यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला. ते सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे. ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात, मारवाह स्कॉशिया बँकेत आर्थिक विश्लेषक म्हणून रुजू झाले आणि नंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) बनले.त्यानंतर त्यांची बँकेचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष, मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना उपाध्यक्ष आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली. २००८ मध्ये त्यांना बँकेचे उपाध्यक्ष आणि सीओओ म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले, या पदावरून ते २०१४ मध्ये निवृत्त झाले.

मारवाह यांनी टोरोंटो स्टार दैनिक, टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यासारख्या अनेक नामांकित कॅनेडियन संस्थांच्या बोर्डवर काम केले आहे. ते शिख फाउंडेशन ऑफ कॅनडाच्या संस्थापकांपैकी एक आहेत, जे प्रवासी समुदायामध्ये शीख संस्कृती आणि कलांना प्रोत्साहन देत आहेत. सरबजीत मारवाह यांनी १० नोव्हेंबर २०१६ रोजी पदभार स्वीकारला, ते कॅनडाचे पहिले शीख सिनेटर बनले. त्यांनी राजीनामा का दिला? याबाबत ते उघडपणे बोलले नाहीत, मात्र भारत-कॅनडा तणावाच्या पार्श्वभूमीवर आलेला हा राजीनामा चर्चेचा विषय बनला आहे.

Exit mobile version