आयसीसीने ट्रान्सजेंडर क्रिकेटपटूंवर बंदी घातल्यानंतर कॅनडाच्या डॅनियल मॅकगेहे हे यांनी निवृत्ती घेतली आहे.डॅनियल मॅकगेहे ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटर आहे.आयसीसीच्या निर्णयानंतर मंगळवारी डॅनियल मॅकगेहे हिने खेळातून निवृत्तीची घोषणा केली.
जागतिक क्रिकेट संघटनेकडून महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना बंदी घातली आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी ट्रान्सजेंडर क्रिकेटर्सवर बंदीची घोषणा केली.त्यानंतर काही वेळातच कॅनडाची क्रिकेटपटू डॅनिएल मॅकगेहेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.आयसीसीच्या या निर्णयामुळे मॅकगेहे याने नाराजी व्यक्त करत खेळात सर्वसमावेशकतेसाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे त्याने सांगितले.
मॅकगेहे सप्टेंबरमध्ये ब्राझील विरुद्ध कॅनडाकडून महिला T२० खेळल्यावर आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटपटू ठरली.मॅकगेहे ही ऑस्ट्रेलियन वंशाची आहे ती २०२० मध्ये कॅनडाला जाण्यापूर्वी पुरुष म्हणून मेलबर्नमध्ये क्रिकेट खेळली.त्यानंतर २०२१ मध्ये वैद्यकीय संक्रमण केले आणि मॅकगेहे कॅनडामध्ये महिला क्रिकेटर बनून खेळू लागली.मॅकगेला ऑक्टोबर २०२२ मध्ये राष्ट्रीय महिला संघात बोलावण्यात आले.
हे ही वाचा:
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!
‘शेतात राब जाळणाऱ्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव योजनेचा लाभ देऊ नये’!
मोदींना पनवती म्हणणे राहुल गांधींना भोवणार!
नाशिक शहर पोलीस आयुक्तांची उचलबांगडी; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त
दरम्यान, आयसीसीकडून ट्रान्सजेंडर क्रिकेटपटूंवर बंदी घातल्यानंतर मॅकगेहे याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत निवृत्तीची घोषणा केली.ती म्हणाली, आयसीसीच्या आजच्या निर्णयानंतर मला जड अंतःकरणाने सांगायचे आहे की, माझी क्रिकेट कारकीर्द संपली आहे. ते जितक्या लवकर सुरू झाले तितक्या लवकर ते संपले पाहिजे. माझ्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे आभार. माझे सहकारी, माझे विरोधक, क्रिकेट समुदाय आणि माझ्या प्रायोजकांचे आभार.मात्र, मी वचन देतो की आमच्या खेळातील समानतेचा लढा मी कधीही थांबवणार नाही. आम्हाला सर्वोच्च पातळीवर क्रिकेट खेळण्याचा अधिकार आहे. आम्ही खेळाच्या सुरक्षिततेसाठी आणि अतुलनीयतेसाठी धोका नाही,असे मॅकगेहेने इंस्टाग्रामवर लिहिले आहे.
आयसीसीने नियम सांगितले
आयसीसीने सांगितले की, त्यांच्या बोर्डाने ‘नवीन लिंग पात्रता नियम’ मंजूर केले आहेत. यानुसार, “कोणत्याही प्रकारचे पुरुष-महिला सहभागी ज्याने कोणत्याही प्रकारचे पुरुष यौवन झाले आहे, ती कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा लिंग पुनर्नियुक्ती उपचारांची पर्वा न करता आंतरराष्ट्रीय महिला खेळात भाग घेण्यास पात्र राहणार नाही.” कदाचित त्याने हे केले असावे.