24 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषभारताने डोळे वटारल्यावर कॅनडाचे ट्रुडो वरमले

भारताने डोळे वटारल्यावर कॅनडाचे ट्रुडो वरमले

आता निवडणुकीत हस्तक्षेपाचे चीनवर आरोप

Google News Follow

Related

भारतावर कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा आरोप करणाऱ्या जस्टिन ट्रुडो सरकारने आता आपले दावे आणि आरोपांवरून यू टर्न घेतला आहे. कॅनडाची गुप्तचर संस्था सीएसआयएसने पंतप्रधान ट्रुडो यांच्या कार्यालयात सोपवलेल्या चौकशी अहवालात गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत चीनने हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कॅनडाच्या तपास संस्थांनी हे आरोप सिद्ध करणारे अनेक पुरावे पंतप्रधान कार्यालयाला सोपवले आहेत.

सीएसआयएसने ‘कॅनडामधील लोकशाही प्रक्रियेमध्ये परदेशी राष्ट्र्रांचा हस्तक्षेप’ हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सोपवला आहे. त्यामध्ये ‘पीपल रिपब्लिक चायना’ने सन २०१९ आणि २०२१मधील सर्वसाधारण निवडणुकांमध्ये भ्रामकपणे हस्तक्षेप केला होता, असे नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

योगगुरू रामदेव, बाळकृष्ण यांच्याकडून बिनशर्त माफी

मांजरीला वाचवायला विहिरीत उतरलेल्या पाच जणांचा मृत्यू

१० वर्षांत सेन्सेक्स २५ हजारांवरून ७५ हजारांवर!

“भविष्य पाहायचे आणि अनुभवायचे असेल तर भारतात या”

तीन दिवसांपूर्वीच कॅनडामधील गुप्तचर संस्थांनी भारत आणि पाकिस्तानवर सन २०१९ आणि २०२१मध्ये येथील दोन स्थानिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आरोप केला होता. भारताने या आरोपावर कठोर शब्दांत टीका करून ते फेटाळले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही हे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. तसेच, भारताने नेहमीच सशक्त लोकशाहीला प्राधान्य दिले असून कधीच परकीय बाबींमध्ये हस्तक्षेप केलेला नाही, असे निक्षून सांगितले होते.

सन २०१९ आणि २०२१मधील निवडणुकांमध्ये जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाचा विजय झाला होता आणि ते पंतप्रधान झाले होते. आता नव्या अहवालानुसार, या दोन्ही निवडणुकांमध्ये भारताने हस्तक्षेप केल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.गेल्या वर्षी ७ सप्टेंबरपासून भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत. गेल्या वर्षी कॅनडाच्या पंतप्रधानांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. मात्र भारताने पुरावे मागितले असता ते कॅनडा सरकार सादर करू शकले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा