भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. मालिकेतील हा अखेरचा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात वेस्ट इंडिजला धूळ चारत व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. या मालिकेतील सारेच सामने या मैदानावर खेळले गेले असून आजच्या सामन्यानंतर दोन्ही संघ कलकत्त्याला रवाना होतील तिथे या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
वेस्ट इंडिजचा संघ या सामन्यात आपली लाज राखायच्या उद्दिष्टाने मैदानात उतरेल. आजचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर या मालिकेचा विजयी शेवट केल्याने टी-20 मालिकेसाठी संघाचे मनोधैर्य सुधारेल याकडेही त्यांचे लक्ष असेल. संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड दुसऱ्या सामन्यात दुखापतीच्या कारणाने खेळला नव्हता. पण तिसऱ्या सामन्यात तो परतण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
हिजाब वादावरून दोन नेत्यांची भिन्न मते…बिघडले महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार?
बूट पॉलिश करणारे रेल्वेविरोधात आक्रमक…. CSMT स्थानकात कर्मचाऱ्यांचे आंदोलन
आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी सुधारित नियमावली
हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप
पण रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ पूर्णपणे ३‐० अशा मालिका विजयाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच मैदानात येईल. पण यावेळी भारतीय संघाकडे वेगवेगळे प्रयोग करायला संधी असणार आहे. मालिकेत २‐० अशी विजयी आघाडी घेतल्यामुळे भारतीय संघाला आपल्या बाहेर बसलेल्या खेळाडूंना संधी देता येऊ शकते. कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात याचे सूतोवाचही केले आहे. शिखर धवन तिसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचे कर्णधार रोहित सांगितले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात सलामीला शिखर धवन पाहायला मिळू शकतो. पण शिखर धवन नेमका कोणाच्या जागी संघात येणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. दुपारी १ वाजता नाणेफेक होईल, तर १.३० वाजता सामना सुरू होईल