मा शारदा मंदिर मुक्त करण्यासाठी भारताला साकडे!

केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालावे, शारदा सेवा समितीची विनंती

मा शारदा मंदिर मुक्त करण्यासाठी भारताला साकडे!

पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या जम्मू-काश्मीरस्थित (पीओजेके) मां शारदा मंदिराला पाकिस्तानी लष्करापासून मुक्त करण्यासाठी सेवा शारदा समितीने भारत सरकारकडे मदत मागितली आहे. मंदिर नियंत्रणमुक्त झाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा होणार आहे.

‘पाकिस्तानी लष्कराने प्राचीन शारदा मंदिर परिसरावर अतिक्रमण केले होते आणि सेवा शारदा समितीच्या बाजूने न्यायालयाने आदेश देऊनही तिथे एक कॉफी हाऊस उघडले गेले,’ असा आरोप सेवा शारदा समितीचे संस्थापक रविंदर पंडिता यांनी बेंगळुरू येथील पत्रकार परिषदेत केला. शारदा पीठ परिसरात निर्माण केलेल्या या कॉफी हाऊसच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालावे, अशी विनंती शारदा सेवा समितीने केली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ३ जानेवारी, २०२३ रोजी अतिक्रमण रोखण्याची मागणी करणाऱ्या सेवा शारदा समितीच्या बाजूने निर्णय दिला होता.

हे ही वाचा:

बाळासाहेबांच्या वक्तव्याचा आधार घेऊन बाबरी पतनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

मराठवाड्याची लेक करणार नव्या जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य

जय श्रीराम: अयोध्येत १० वर्षांत ८५ हजार कोटींचा मेकओव्हर होणार

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित

अतिक्रमण न हटल्यास एलओसी येथे आंदोलन
पाकव्याप्त जम्मू काश्मीरधील नागरिक समाजनेही या मुद्द्यावर सेवा शारदा समितीच्या साथीने आवाज उठवला आहे. भाविकांना तीर्थस्थळी जाण्यासाठी शारदा पीठ पुन्हा खुले केले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जर पाकिस्तानी अधिकारी आणि त्यांच्या लष्कराने कॉफी हाऊसला न हटवल्यास आपण एलओसीपर्यंत आंदोलन करू आणि ते ओलांडण्याचा प्रयत्न करू, असा इशारा रविंदर पंडिता यांनी दिला आहे. तसेच, या पीठाला युनेस्कोने वारसास्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या वर्षी १० हजार भाविक टिटवाल पोहोचले
टिटवालमध्ये नव्याने निर्माण केलेल्या शारदा मंदिर आणि शीख गुरुद्वाराबाबत संपूर्ण माहिती व यात्रेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एक वेबसाइट सुरू करण्यात आल्याचे सेवा शारदा समितीचे संस्थापक रविंदर पंडिता यांनी सांगितले. हे मंदिर १९४७च्या आधी त्याच जागी होते, मात्र ते पेटवून दिले होते. काश्मीरच्या टिटवालमध्ये नव्या शारदा मंदिराची निर्मिती केल्यानंतर २२ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मंदिराचे उद्घाटन केले होते. टिटवालमध्ये ज्या जागी हे मंदिर उभारण्यात आले आहे, त्या जागी फाळणीच्या आधी शारदा मंदिरात जाण्यासाठी भाविक आसरा घेत असत. या मार्चमध्ये मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर सुमारे १० हजार पर्यटकांनी या नव्या शारदा मंदिराचे आणि गुरुद्वाराचे दर्शन घेतले आहे.

Exit mobile version