प्रचार ईव्हीएमने केला की आणखी कोणी हे पाहिले पाहिजे!

आदित्य ठाकरेंचा वक्तव्य

प्रचार ईव्हीएमने केला की आणखी कोणी हे पाहिले पाहिजे!

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महायुती २२८, मविआ ४७ आणि इतर १३, अशी स्तिथी आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून विजय निश्चित केला आहे. याच दरम्यान, शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य समोर आले आहे. आजचा निकाल अनपेक्षित आहे, परंतु मान्य करून पुढे जायला हवे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंनी यावेळी पुन्हा एकदा एव्हिएमवर बोट ठेवले आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आदित्य ठाकरे म्हणाले,  वरळीमध्ये आज आमचा विजय झाला. अनके ठिकाणी निष्ठावंत म्हणून काम केल्याचा सर्वांचा हा विजय आहे. आज हा निकाल अपेक्षित नाहीये, याबाबत बोलण्यासाठी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेवून भूमिका स्पष्ट करतील. काही ठिकाणी अजून मतमोजणी सुरु आहे, फायनल निकाल अजून यायचा आहे.

संजय राऊत यांनी हा निकाल अमान्य केला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला असता. आदित्य ठाकरे म्हणाले, यामध्ये एक नक्की आहे की, ‘महाराष्ट्राच्या जनेतेने मतदान केले आहे कि एव्हिएमने’ हा एक प्रश्न आहेच. लोकसभेला विजय मिळविला मात्र, विधानसभेला कमी पडलात? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, याच महाराष्ट्राने लोकसभेला आम्हाला आशीर्वाद दिला होता, यंदाही आपला विजय होईल अशी लाट दिसत होती. आजचा निकाल अपेक्षित नाहीये, पण मान्य करून पुढे जायला पाहिजे. यामध्ये एव्हिएमने कि आणखी कोणी किती प्रचार केला हे पाहिले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : 

“आम्ही आधुनिक अभिमन्यू, अखेर चक्रव्यूह तोडून दाखवला”

अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक! ८३ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय

उद्धव ठाकरेंना २० देखील जागा गाठत्या आल्या नाहीत, राज्याला तोंड दाखवू नये!

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर जनतेचा विश्वास बसलाय”

Exit mobile version