आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे कोल्हापूर येथील कॅमेरामन प्रमोद सौंदडे यांचे सोमवारी म्युकरमायकोसिसमुळे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या सौंदडे यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.
सौंदडे यांचे पार्थिव रुग्णालयातून आणण्यासाठी त्यांच्या भावाकडे पैसेही नव्हते. शेवटी पत्रकारांकडून त्यांना मदत मिळाल्यानंतर त्यांना सौंदडे यांचे पार्थिव घरी आणता आले.
बारा वर्षांपूर्वी सौंदडे यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला होता. एबीपी माझा मधून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर आयबीएन लोकमतमध्ये ते कॅमेरामन म्हणून काम करू लागले. आपल्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने बातमी बोलकी करण्याचे तंत्र त्यांच्यापाशी होते. कोल्हापूर प्रेस क्लबने त्यांचा उत्कृष्ट कॅमेरामनम म्हणून गौरव केला होता. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानात तालिबान; त्यामुळे जिन्स ‘बॅन’
मला गांजाची शेती करू द्या!; शेतकऱ्याची आर्त मागणी
निराधार मुलांना ‘स्वनाथ’चा आधार
आता सरकारने या कुटुंबाला मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी मृत्युमुखी पडलेले पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्युनंतर त्यांना कोणतीही मदत राज्य सरकारकडून देण्यात आली नाही. केंद्र सरकारने त्यांना ५ लाखांची मदत केली होती. त्यामुळे सौंदडे यांना राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.