27 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषअजितदादा, आता तुम्ही योग्य जागी बसलात !

अजितदादा, आता तुम्ही योग्य जागी बसलात !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मिश्किल टिप्पणी

Google News Follow

Related

अमित शहा यांचा दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून पुण्यात आले आहेत.पुण्यातील सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलच्या शुभारंभाच्या यांचा कार्यक्रमात ते बोलत होते. ”दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा पुण्यात आलो आहे. मी प्रथमच त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसलो आहे. मी पवार यांना सांगू इच्छीतो की, खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. तुमच्यासाठी हीच जागा योग्य होती, पण तुम्ही उशिर केलात,” असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह म्हणाले.

सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ चा शुभारंभ अमित शाहांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. शाह कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी अजित पवारांबाबत भाष्य केलं. शाह यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी नमस्कार करत प्रतिसाद दिला.देश एका बाजूला आहे आणि महाराष्ट्र एका बाजूला आहे. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा ४२ टक्के आहे.तसेच पुण्याला सहकाराची पंढरी म्हटलं जातं आणि देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा ४२ टक्के आहे.

हे ही वाचा:

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना नको आहे ‘हिंदीची गुलामगिरी’

नूंह हिंसाचार प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा ‘आप’ नेत्यावर आरोप

ज्या इमारतीतून दगडफेक झाली त्या नूँहमधील हॉटेलवर बुलडोझर

मुंबईच्या समुद्रात बोड बुडाली, दोनजण बेपत्ता

त्यामुळे उद्घाटनासाठी पुण्याची निवड केल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलो आहे, असं ते म्हणाले. सहकार क्षेत्राचा मोठा डेटा तयार होत आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या गावात, जिल्ह्यात किंवा राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वरिष्ठांना आपल्या गावाची संपूर्ण माहिती लगेच मिळेल आणि उपाययोजना करण्यात येणार आहे. हा डेटा बनवण्याचं ९५ टक्के काम पूर्ण झालं असल्याचं ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या आणि सहकार खात्याचं नेमकं व्हिजन काय आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. त्यात सहकार क्षेत्राच्या अनेक निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्यांचं निराकरण झालं. कोणाच्याही नातेवाईकाला नोकरी मिळणार नाही तर फक्त कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच नोकरी मिळणार असल्याचं ते म्हणाले. को-ऑपरेटिव्ह बॅंकांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या पुढे सहकार क्षेत्राशी संबंधित पारदर्शक होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी – अमित शाह

आम्ही कायदा बदलून सहकार मतदारांना अधिकार दिले आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावीत. अशा सूचना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखमंत्र्यांनी आज सकाळच्या बैठकीतच दिलेल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आतापर्यंत १० हजार कोटींची घोषणा केली मात्र जेवढे पैसे हवेत तेवढे देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा