पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसनेते खासदार राहुल गांधी यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी वकील विनित जिंदल यांनी केली आहे. सद्यस्थितीत दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
खासदार राहुल गांधी यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालौर येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांना पनवती असे म्हटले होते. या आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजपने आक्षेप घेऊन राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. अशाप्रकारचे वक्तव्य ‘लाजिरवाणे आणि अवमानजनक’ असल्याचा दावा करत त्यांनी माफीची मागणी केली होती.
हे ही वाचा:
गुजरात राज्याचा राज्य मासा म्हणून ‘घोळ’ माशाची निवड!
राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!
‘शेतात राब जाळणाऱ्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव योजनेचा लाभ देऊ नये’!
राहुल गांधी यांनी प्रचारसभेदरम्यान ‘पीएमचा अर्थ पनवती मोदी आहे’, असा उल्लेख केला होता. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी पनवती हा शब्द वापरला होता. भारताचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर पनवती हा शब्द ट्रेंड होतो आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. देशाच्या पंतप्रधानांबाबत ही टिप्पणी लाजिरवाणी, निंदनीय आणि अवमानजक आहे. राहुल यांनी आपला खरा रंग दाखवला आहे. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांची आई सोनिया गांधी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांना ‘मौत का सौदागर’ असे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेस गुजरातमध्ये संपूर्णपणे नेस्तनाबूत झाली होती,’ याची आठवण प्रसाद यांनी यावेळी करून दिली.