नगराध्यक्षांचा कार्यकाळ आता अडीच ऐवजी पाच वर्षांचा

राज्य मंत्रिमंडळात महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नगराध्यक्षांचा कार्यकाळ आता अडीच ऐवजी पाच वर्षांचा

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होणार असून राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. त्याचबरोबर महायुती सरकारकडून महत्त्वाचे निर्णय देखील घेतले जात आहेत. मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात नगरविकास विभाग, ऊर्जा विभाग, सहकार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महसूल विभाग, पशूसंवर्धन व दुग्धविकास विभाग या विभागांकडून महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

नगरविकास विभागाने नगराध्यक्षांच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्ष असणार आहे. याआधी नगराध्यांचा कालावधी हा अडीच वर्षे इतका होता. तर दुसरीकडे पशूसंवर्धन व दुग्धविकास विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी १४९ कोटींची मान्यता देण्यात आली आहे. त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सुधारित ३७ हजार कोटी खर्च येणार असून त्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी पतंजलीचा माफीनामा न्यायालयाने केला मान्य

प्रमोद भगत पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकला मुकणार; १८ महिन्यांसाठी निलंबित

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नऊ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम नागपूरच्या संत्र्यांवर? निर्यात रखडली

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आठ निर्णय

Exit mobile version