देशभरात १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये होणार सुरू

एक नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च येईल

देशभरात १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये होणार सुरू

देशातील नर्सिंग सेवेला बळकटी देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने देशभरात १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांसोबत ही सर्व नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत.

या यादीत महाराष्ट्रातील गोंदिया आणि नंदुरबार या दोन नर्सिंग महाविद्यालयांचा  समावेश आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात ही नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नर्सिंग कॉलेजमध्ये बीएस्सी नर्सिंगचे शिक्षण दिले जाईल.

सध्या देशात बीएस्सी नर्सिंगच्या एकूण १,१८,००० जागा रिक्त आहेत. नवीन नर्सिंग कॉलेज सुरू केल्याने त्यांची संख्या १५,७०० ने वाढेल. एक नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी १० कोटी रुपयांचा खर्च येईल आणि दोन वर्षांत १,५७० कोटी रुपये खर्चून सर्व नर्सिंग कॉलेज सुरू केले जातील. त्यांच्या मते, नवीन नर्सिंग कॉलेज सुरू केल्याने त्यांच्या राज्यनिहाय वितरणातील विद्यमान असमानता दूर होण्यास मदत होईल. सध्या ४० टक्के नर्सिंग कॉलेज आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मर्यादित आहेत असे मांडविया यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे आरोग्य क्षेत्रातील भौगोलिक आणि ग्रामीण-शहरी असमानता दूर होईल, ज्यामुळे नर्सिंग व्यावसायिकांची उपलब्धता कमी झाली आहे आणि आरोग्य सेवांपासून वंचित भागातील सेवांवर परिणाम झाला आहे.  या नर्सिंग महाविद्यालयांच्या स्थापनेमुळे आरोग्य सेवेतील पात्र मनुष्यबळाच्या उपलब्धतेला मोठी चालना मिळेल.हा प्रकल्प पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे आणि नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तपशीलवार कालमर्यादा निश्चित केली आहे.

हे ही वाचा:

एकलव्य खाडेचे वेगवान शतक; एजिस फेडरल वेंगसरकर अकादमी विजयी

फडणवीसांचे सोडा, तुम्हाला साळवींचे अंतरंग तरी कळतात का?

प्रकल्प नकोत बेरोजगारीही नकोमग हवंय काय कोकणाला?

‘लढाऊ’ शिवांगी राफेलमधून घडवणार इतिहास

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, मोदी सरकारने देशातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण वेगाने वाढवण्याचे काम केले आहे. ज्या अंतर्गत एमबीबीएस आणि पीजीच्या जागा दुपटीने वाढल्या आहेत. नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णयही त्याच दिशेने आहे.

Exit mobile version