भारताचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री यांचे ट्वीटर खाते तात्पुरते बंद करणे ट्वीटरला चांगलेच महागात पडणार असे दिसत आहे. मंत्र्यांचे ट्वीटर खाते तात्पुरते बंद केल्याबद्दल लोकसभा सचिवालयाकडून ट्वीटरला या निर्णयाबद्दल विचारणा करणारे पत्र लिहीण्यात आले आहे. या पत्रामधून या निर्णयामागची कारणे दोन दिवसात स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेला काही काळ ट्वीटर आणि भारत सरकार विविध मुद्यांवरून आमन- सामने आले होते. ट्वीटरने मंत्री रवि शंकर प्रसाद यांचे खाते काही काळासाठी बंद केले होते. त्यासाठी त्यांनी कॉपी राईट उल्लंघनाचे कारण दिले होते. परंतु त्यानंतर काही कळातच त्यांनी माफी मागत हे अकाऊंट पुन्हा चालू केले होते. ट्वीटरला मंत्र्यांची काढलेली ही खोडी महागात पडणार अशी चिन्हे दिसत आहेत.
हे ही वाचा:
आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार
भारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब
महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?
निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच
लोकसभेच्या माहिती आणि तंत्रज्ञान समितीने याबाबत ट्वीटरला खडसावत याबद्दलची कारणे दोन दिवसात स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री रवि शंकर यांच्यामते ट्वीटरने हे पाऊल त्यांनी ट्वीटरवर, भारताचे नवे नियम न पाळल्याबद्दल टीका केली त्यामुळे घेतले असावे.
याबाबत संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान समितीचे काही सदस्य गुगल आणि फेसबूकच्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी या दोन्ही कंपन्यांना भारताच्या नव्या तंत्रज्ञान नियमांचा स्वीकार करण्याचे निर्देश दिले होते.