26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषयेत्या आठवड्यात देशात CAA लागू होईल, ही माझी गॅरंटी!

येत्या आठवड्यात देशात CAA लागू होईल, ही माझी गॅरंटी!

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा

Google News Follow

Related

येत्या एका आठवड्यात देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होईल, असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. शंतनू ठाकूर म्हणाले की, मी मंचावरून हमी देत ​​आहे की, येत्या सात दिवसांत केवळ बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीएए लागू होईल. दरम्यान, शंतनू ठाकूर दक्षिण २४ परगणा येथील काकद्वीप येथे एका जाहीर सभेत बोलत होते.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं वर्णन ‘देशाचा कायदा’ असे केले होते. तसेच सीएएची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही, असे देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सीएएबद्दल लोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता.

हे ही वाचा:

फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला खिंडार!

‘ऍनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर, आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री!

इटलीचा यानिक सिनर ऑस्ट्रेलिया ओपनचा विजेता!

तव्यावर बसून आशीर्वाद देणाऱ्या गुरुदास बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल!

अमित शाह म्हणाले होते की, “कधीकधी त्या देशात सीएए लागू होईल की नाही? याबद्दल लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. यावर मी स्पष्ट करू इच्छितो की, सीएए हा देशाचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही आमच्या पक्षाची वचनबद्धता आहे.

दरम्यान , नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) नुसार, ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या गैर-मुस्लिम (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल.सीएए डिसेंबर २०१९ मध्ये संसदेनं मंजूर केला होता.कायदा मंजूर झाल्यानंतर आणि राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्यानंतर देशाच्या काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर केलेला दावा खरा की खोटा ठरेल ते पाहावे लागेल.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा