पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याची घोषणा केली. सीएए हे सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे विभिन्न अंग होते. भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर संसदेत ११ डिसेंबर, २०१९ रोजी याला मंजुरी दिली होती. या निर्णयाला आफ्रिकी-अमेरिकी अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन हिने समर्थन दिले आहे. ‘हा शांतीच्या दिशेने चालणारा मार्ग आहे. हे लोकशाहीचे खरे कार्य आहे,’ अशा शब्दांत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
खिश्चन धर्मीय आणि धार्मिक स्वातंत्र्याची समर्थक असणाऱ्या मेरी मिलबेन हिने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये छळ होत असलेल्या बिगरमुस्लिम प्रवाशांना भारतीय नागरिकता प्रदान करण्याचा निर्णय घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ‘एक ख्रिश्चन, आश्वस्त महिला आणि धार्मिक स्वातंत्र्याला वैश्विक समर्थन देणारी एक व्यक्ती म्हणून मी आज सीएए कायदा लागू करण्याची घोषणा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अभिनंदन करते.
हे ही वाचा..
देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू
शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!
“उबाठाच्या बाळराजांना सांगणं आहे, जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो”
या निर्णयामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या छळामुळे भारतात आलेल्या बिगरमुस्लिम प्रवासी, ख्रिश्चन आणि हिंदू समाजाला भारत राष्ट्रीयत्व प्रदान करेल,’ अशी प्रतिक्रिया मिलबेन हिने दिली आहे. त्यासाठी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. ‘तुमच्या दयाळू नेतृत्वासाठी आणि छळ झालेल्या नागरिकांचे स्वागत करण्यासाठी आणि धार्मिक स्वातंत्र्याला कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारत सरकारचे आभार,’ अशा शब्दांत तिने ‘एक्स’वर जाहीर आभार मानले आहेत.