क, ड संवर्ग पदभरती प्रक्रियेला गोंधळाचा संसर्ग

क, ड संवर्ग पदभरती प्रक्रियेला गोंधळाचा संसर्ग

काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यानंतर या परीक्षेची तारीख २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर जाहीर करण्यात आली. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आताही या परीक्षेंचा गोंधळ काही संपतच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज भरल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र मिळाल्याचे समोर आले आहे. २४ आणि ३१ तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा होणार आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या संवर्गातील अर्ज विद्यर्थ्यांनी भरले आहेत. मात्र, या सर्व संवर्गाची परीक्षा एकाच दिवशी असल्याने दोन परीक्षांचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी केवळ गरळ ओकली

बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!

‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

विद्यार्थ्यांचे दोन पेपर एकाच दिवशी असून परीक्षेचे केंद्र मात्र वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत. एक पेपर सकाळी १० ते १२ या वेळेत आहे, तर दुसरा पेपर ३ ते ५ या दरम्यान आहे. मधल्या वेळात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कसे पोहचायचे, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. अर्ज भरताना जवळचे जिल्ह्यातील केंद्र निवडण्याची मुभा असतानाही काहींना लांबचे केंद्र मिळाले आहे. प्रवेशपत्रावरील पिनकोडही चुकीचे असल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे.

आरोग्य विभागाची परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी असलेल्या न्यासा कंपनीच्या गोंधळामुळे यापूर्वी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली होती. परीक्षेच्या आधी ऐन वेळी अचानक ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता.

Exit mobile version