राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आज बायपास शस्त्रक्रिया होणे अपेक्षित असल्याचे समजत आहे. ही शस्त्रक्रिया दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पार पडणार असल्याचे देखील कळले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गेल्या आठवड्यात एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती स्थिर असून ते तज्ञांच्या निगराणीखाली आहेत असे सांगण्यात आले आहे. ७५ वर्षीय कोविंद यांनी लष्करी रुग्णालयात शुक्रवारी आपली सामान्य आरोग्य चाचणी करून घेतली होती.

हे ही वाचा:

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ताजिकिस्तान भेटीवर

सोमवारी महाराष्ट्रात आढळले ३१,६४३ नवे कोरोना रुग्ण

संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत नांदेडमध्ये शीख तरूणांकडून पोलिसांवरच हल्ला

या पत्रकानुसार “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना २७ मार्च २०२१ रोजी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तपासाअंती डॉक्टरांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे आहे. ही शस्त्रक्रिया ३० मार्च रोजी होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत राष्ट्रपती कोविंद यांची प्रकृती सध्या स्थिर असून तज्ञांच्या देखरेखीखाली आहेत.”

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची कर्तव्ये पार पाडली आहेत. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या दिल्ली लेफ्टनंट गव्हर्नरचे अधिकार वाढवणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी करून त्याला कायद्याचे रुप दिले आहे. हे विधेयक मागील आठवड्यात २२ रोजी लोकसभेत आणि राज्यसभेत २४ मार्च रोजी मंजूर झाले होते.

Exit mobile version