मांसाहारापेक्षा शाकाहार महत्त्वाचा अशी भूमिका आता अनेक जण घेत आहेत. राणीच्या बागेच्या बाबतीतही अशीच भूमिका आता घेतली जात आहे.
भायखळा राणीबागेतील उपाहारगृहात मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार नसल्याने मांसाहार करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. राणीबागेतील उपाहारगृहाची जागा भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देताना सत्ताधारी शिवसेनेने शाकाहारी खाद्यपदार्थ देण्यास हिरवा कंदील दाखवत मांसाहार करणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना शाकाहाराच्या बाजूने झुकत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राणीच्या बागेतील उपहारगृहात कोणतेही मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करत उपाहारगृहाची जागा भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. हे उपाहारगृह पुढील पाच वर्षांकरता चालवण्यास देण्यासाठी महापालिकेने परिचय ग्लोबल वर्क्स यांना पहिल्या वर्षात प्रती माह पाच लाख ५० हजार २५ रुपये भाडे आकारले जाण्यास मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. पेंग्विन कक्ष इमारतीच्या तळ मजल्यावर सुमारे हे उपाहारगृह असून त्यामध्ये अनेक सोयीसुविधा आहेत.
हे ही वाचा:
उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला मागे टाकत गुजरातची मुसंडी
अखेर विराटने जिंकली नाणेफेक! पहिल्या दिवशी फक्त ७८ षटकांचा खेळ
महाराष्ट्र अलर्टवर! ओमिक्रोन मुंबईच्या उंबरठ्यावर?
ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह
सर्वाधिक शाकाहार- पूरक शहर म्हणून पिटा इंडिया या संस्थेचा २०२१चा मुंबईला प्राप्त झालेला पुरस्कार महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वीकारल्यानंतर महापौर वादात सापडल्या होत्या. तसेच मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून आहार पद्धतीवरून वाद सुरु आहेत. काही भागांत इमारतींमध्ये मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना घरे दिली जात नाहीत. या मुद्द्यावरून मुंबई महापालिका सभागृहातही वाद झाला होता. मांसाहारी कुटुंबाला घरे नाकारणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याचा ठराव सभागृहाने मंजूर केला होता; मात्र, त्यावर अंमलबजावणी झालेली नाही.