मुंबईतील १६९ वर्ष जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाच्या जीर्णोद्धाराच्या कामाला युनेस्कोने जाहीर केलेल्या आशिया पॅसिफिक पुरस्कारांमध्ये सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी गुणवत्ता पुरस्कार मिळाल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. वैष्णवने नूतनीकरणाच्या कामानंतर स्टेशनच्या नवीन स्वरूपाची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहे.
भारतीय रेल्वेचे सर्वात जुने स्थानक, भायखळा आजही त्याच स्वरूपात वापरले जात आहे. गेल्या तीन वर्षांत या स्थानकाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामासाठी युनेस्कोचा एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार ऑफ मेरिट प्राप्त झाला आहे.
हे ही वाचा:
बेलापूरहून अलिबागला जा आता वॉटर टॅक्सीने
उद्धव ठाकरे नैराश्यातून हे बोलत आहेत…
‘डीजे स्नेक’ कार्यक्रमात चाहत्याना चोरांचा दंश
अभिनेते पुनीत इस्सार ह्यांना १३ लाखांनी लुटले
‘ आय लव्ह मुंबईच्या विश्वस्त शायना एनसी यांच्या पुढाकाराने भायखळा स्थानकाचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम जायंट्स इंटरनॅशनलचे संस्थापक पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मरणार्थ बजाज ट्रस्ट ग्रुप आणि आभा नारायण असोसिएट्स यांनी सीएसआर स्वरूपात केले आहे. बजाज ग्रुपचे मीनल बजाज आणि नीरज बजाज आणि जमनालाल बजाज फाऊंडेशन यांनी या वारसा संवर्धनासाठी ४ कोटी रुपये दिले. वास्तुविशारद अभय नारायणन यांनी मोफत काम केले आहे.
Restoration work of 169 years old, Byculla Railway Station, gets UNESCO recognition. #ConservingHeritage pic.twitter.com/eiRsAT4hVK
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) November 27, 2022
असा आहे भायखळा स्टेशनचा इतिहास
भायखळा स्टेशन १८५३ मध्ये ब्रिटीश राजवटीत सुरु झाले आणि १८९१ मध्ये ते एक प्रमुख स्टेशन बनले. हे केवळ मुंबईतीलच नव्हे तर देशातील सर्वात प्राचीन रेल्वे स्थानकांपैकी एक आहे भायखळा हे नाव भाय (बाबाजी) आणि खळा (धान्य साठविण्याची जागा) यावरून पडले असे जाते. १८५७ मध्ये या स्टेशनने वर्तमान स्वरूप घेतले पण तत्पूर्वी वर्षभरापूर्वीच ते लाकडी संरचनेच्या रूपात बांधले गेले होते. त्यामुळे या स्टेशनची सध्याची इमारत ही भारतातील सर्वात जुन्या स्टेशनची इमारत ठरते. मुंबईचे पहिले रेल्वे इंजिन भायखळा मार्गे मुंबईमध्ये आणण्यात आले आणि सुमारे २०० मजुरांनी ते ओढत आणले होते.
पुरस्काराच्या शर्यतीत होते ६ देश
या वर्षीच्या पुरस्कारासाठी अफगाणिस्तान, चीन, भारत, इराण, नेपाळ आणि थायलंडमधील १३ प्रकल्प होते. आंतरराष्ट्रीय ज्युरींनी भायखळा स्थानकाची निवड केली. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील ११ देशांमधील एकूण ५० नोंदींचे सदस्यांनी पुनरावलोकन केले. युनेस्कोच्या ज्युरींनी ‘सीएसएमटी आर्किटेक्चरल म्युझियम प्रोजेक्ट ऑफ मुंबई’चे कौतुक केले.मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकाला जागतिक मान्यता मिळाली आहे.