मध्य प्रदेश विधानसभेतील नेहरुंचे चित्र काढून डॉ. आंबेडकरांचे चित्र लावले

चित्र खराब झाल्याने काढल्याचा प्रशासनाचा निर्वाळा

 मध्य प्रदेश विधानसभेतील नेहरुंचे चित्र काढून डॉ. आंबेडकरांचे चित्र लावले

मध्यप्रदेश विधानसभेच्या पहिल्या सत्रात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याचे चित्र बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र लावण्यात आले. हे चित्र खराब झाल्यामुळे काढले असून तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र लावल्याचा खुलासा शासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. तरीही कॉंग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप घेऊन हा इतिहास बदलण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर पं. नेहरू यांचे चित्र मुळ ठिकाणी लावावे अन्यथा कॉंग्रेसचे आमदार स्वतःहून ते करतील, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.

हेही वाचा..

  राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास्ठी प्रयत्न करणार

बिहार; जनता दल (युनायटेड) पक्षाच्या नेत्यावर अज्ञातांनी झाडल्या गोळ्या!

हैदराबाद; पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, दोन ड्रग्ज तस्करांपासून ३.५ किलो अफू जप्त!

संसद आवारात राज्यसभा सभापतींची केली नक्कल

कॉंग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज यांनी समाज माध्यमातून भारतीय जनता पक्षावर आरोप केला आहे कि, भाजपा हा रात्रंदिवस इतिहास पुसण्यासाठी काम करत आहे. दरम्यान मध्य प्रदेशच्या नव्या विधानसभेची सुरुवात सोमवार, १८ डिसेंबर पासून झाली. हंगामी अध्यक्ष गोपाल भार्गव यांनी नव्या सदस्यांचे सभागृहात स्वागत केले. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर जवळपास आठवडाभरानंतर चार दिवसांचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पक्षाने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.

Exit mobile version