मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यावेळी त्यांनी राज्य सरकाराच्या योजनांनावर बोट ठेवत मराठा आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले. परंतु, मनोज जरांगेची राजकीय भूमिका आता स्पष्ट दिसून येत असून त्यांचा भंपकपणा उघड करून त्यांच्यावरच भूत नक्कीच उतरवू, असा इशारा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, सतत राष्ट्रात्मक काम करणारे आम्ही आहोत. तेव्हा आता त्या ठिकाणी मराठा समाजाला भावनिक करून मला नेता बनायचे आहे. तुमची वक्तव्ये मुख्य प्रश्नांपेक्षा लाडकी बहीण योजना, अतुल बेनके कोणाला भेटले, भविष्यात काय होणार आहे, अशा राजकीय गोष्टींवर बोलत आहेत. अचानक तुम्हाला मुस्लिम, वंचितांचा कळवळा येतो. त्यानंतर ओबीसी, धनगर यांच्या गोष्टीवर बोलणार. त्यांच्यातील आरक्षण पण हवे आहे आणि त्यांच्या हनुवटीवर हात लावण्याचाही प्रयत्न.
हेही वाचा..
गृहमंत्री अमित शहांच्या सुरक्षेत कुचराई, दोन तरुणांनी केला ताफ्याचा पाठलाग !
न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद !
इलॉन मस्क यांच्याकडून मोदींना कोटी कोटी शुभेच्छा…१० कोटी फॉलोअर झाल्याबद्दल अभिनंदन !
यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा !
ते पुढे म्हणाले, तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत. मराठा समाजाच्या विचारवंतांना आम्ही एकत्रित करणार आहोत. गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमके काय हवे ते द्यायचे आहे. कारण जरांगेंवर प्रेम केलं, पाठबळ दिल, पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसले आहे. ते आपल्याला उतरावे लागेल आणि ते आम्ही निश्चित करू त्याचे अभियान आम्ही सुरु करू, असे प्रवीण दरेकर म्हणाले.