बांगलादेशात रस्त्यात घर बांधून हिंदूंची केली कोंडी !

हिंदुंवरील अत्याचाराच्या घटना सुरूच

बांगलादेशात रस्त्यात घर बांधून हिंदूंची केली कोंडी !

बांगलादेशातील हिंदूंवर सुरू असलेल्या इस्लामी हल्ल्यांदरम्यान सोहेल हाजरा नावाच्या स्थानिक गुंडाने रस्त्याच्या मधोमध रात्रभर घर बांधल्याने २५ हिंदू कुटुंबे अडकून पडल्याचे समोर आले. बांगलादेशातील गोपालगंज जिल्ह्यातील कोटालीपारा उपजिल्हामधील बांदल गावात ही घटना घडली.

यामुळे रहिवाशांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या प्रकरणाबाबत बोलताना ज्योत्स्ना कर्माकर नावाच्या महिलेने खेद व्यक्त केला आहे. त्याने रस्त्यावर घर बांधल्यामुळे आम्हाला घरातून बाहेर पडता येत नाही. रात्रभर नांगरून तिथे घर बांधण्यात आल्याचे एका हिंदू पुरुषाने सांगितले. एक वृद्ध महिलेने सांगितले की, आमच्यात भांडणही झाले नाही. जेव्हा त्याने ते काढले तेव्हा आम्हाला काहीच कळले नाही. इंग्रजांच्या काळापासून हा रस्ता आहे. आम्ही ते लहानपणी पहिले आहे.

हेही वाचा..

अरबी समुद्रात रेस्क्यू करायला गेलेल्या हेलीकॉप्टरला अपघात; तीन जण बेपत्ता

हिंदू विद्यार्थ्यांच्या कपाळावरील तिलक काढण्याचे प्रकरण : दोन शिक्षिका निलंबित

आपचे आमदार अमानतुल्ला खानला चार दिवसांच्या ईडी कोठडीत!

गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक

हिंदू कुटुंबांनी नाकाबंदीला आक्षेप घेतल्यानंतर स्थानिक गुंड सोहेल हाजरा याने त्यांना शारीरिक इजा करण्याची धमकी दिली. बांदल गावातील हिंदू समाज सध्या भीतीच्या वातावरणात जगत आहे. आता परिस्थिती इतकी भीषण आहे की आपत्कालीन परिस्थितीत आम्ही कोणालाही रुग्णालयात नेऊ शकत नाही. आम्हाला रुग्णाला खांद्यावर घेऊन जावे लागेल, असे एका हिंदू पुरुषाने सांगिलते.

दुसऱ्या एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, आमच्याकडे प्रवासासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. रस्ता अतिक्रमणमुक्त केला नाही तर आम्हाला नजरकैदेत राहावे लागेल. बेकायदेशीर घर बांधताना रंगेहात पकडले गेल्यावर सोहेल हाजरा आणि त्याच्या माणसांनी धारदार शस्त्रांनी त्याला धमकावल्याची माहिती त्याने दिली. एका महिलेने सोहेलने त्यांचे क्षेत्र कसे उद्ध्वस्त केले आणि समाजासाठी समस्या निर्माण केल्याबद्दल शोक व्यक्त केला.

दुसरीकडे, आरोपीने याबद्दल सांगिलते की, ज्या जमिनीवर घर बांधले आहे, ती जमीन आपल्या मालकीची आहे. अडकलेल्या हिंदू कुटुंबांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. सध्या तेथे स्तनिकांसाठी एक छोटा असा अरुंद रस्ता देण्यात आला आहे.

Exit mobile version