जर्मनीतील दिग्गज वाहन उद्योग कंपनी फोक्सवॉगनने या दशकाच्या अखेरीस भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येकी चार गाड्यांपैकी एक गाडी इलेक्ट्रिक असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सन २०२२मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा वाटा एकूण विक्री झालेल्या गाड्यांच्या दीड टक्क्याहून कमी आहे. तसेच, पर्यावरणानुकूल गाड्या आणण्याचा मनोदयही कंपनीने जाहीर केला आहे.
कंपनी त्यांच्या नाममुद्रे अंतर्गत भारतात निर्माण होणारी गाडी आणणार आहे. तसेच, पुढील एका वर्षात विजेवर चालणाऱ्या चार गाड्या बाजारात दाखल केल्या जातील, असे फोक्सवॅगनचे भारताचे प्रमुख आशिष गुप्ता यांनी सांगितले. भारतीय बाजारपेठ या दशकात पाच ते सहा टक्के वेगाने वाढेल आणि सन २०३०पर्यंत ५० ते ६० लाखांपर्यंत वाहनांची विक्री होईल. त्यातील २५ ते ३० टक्के वाटा इलेक्ट्रिक गाड्यांचा असेल. या गाड्यांची संख्या दीड ते एक कोटी ८० लाखांपर्यंत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंनी बारसूची जबाबदारी ढकलली फुटीर आमदारांवर
मणिपूरमधून १३ हजार नागरिकांची सुटका
यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !
‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!
सन २०२२मध्ये वाहनउद्योगाच्या ३८ लाखांच्या बाजारपेठेपैकी दीड टक्क्यांहून कमी वाटा हा इलेक्ट्रिक गाड्यांचा होता. तसेच, यात सर्वाधिक वाटा हा टाटा मोटर्सचा होता. मात्र केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देत असल्याने आता एमजी, ह्युंदाई, किया, मारुती आणि फोक्सवॅगन-स्कोडा सारखे ब्रँड्स बाजारात नवीन मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहेत.
भारतामध्येच गाड्यांचे सुटे भाग बनवण्यास सुरुवात करण्याची योजना आहे. असे झाल्यास भारतातच गाडी बनवली जाईल आणि ५० लाखांच्या आत ही गाडी मिळू शकेल, असे गुप्ता यांनी सांगितले.