“भोंगा मुक्त मुलुंड”, मशिदींवरील अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले!

भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या मोहिमेला यश 

“भोंगा मुक्त मुलुंड”, मशिदींवरील अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले!

मशिदींच्या अनधिकृत भोंग्याविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या सातत्याने आवाज उठवत आहेत. राज्यातील अनेक मशिदींना भेट देवून ते अनधिकृत भोंग्याविरोधात कारवाई मागणी करत आहेत. याच दरम्यान, त्यांच्या या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ‘मुलुंड परिसर भोंगा मुक्त’ झाला आहे. मशिदींवरील सर्व अनधिकृत भोंगे मुलुंड पोलिसांनी खाली उतरवले आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत याबाबत माहिती दिली.

मुंबई हायकोर्टाने मशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत नुकताच मोठा निकाल दिला होता. मशिदींच्या भोंग्याविरोधात आवाजाची तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले होते. आवाजा विरोधात तक्रार आल्यास पहिल्यांदा समज द्या, नंतर दंड आकारा, पुन्हा आदेशाचे उल्लंघन केल्यास भोंगा जप्त करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिल्या होत्या.

यानंतर मुलुंडमधील मशिदींच्या भोंग्याच्या आवाजांमुळे प्रदूषण होत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची किरीट सोमय्या यांनी दखल घेत याबाबत पोलीस ठाण्यात आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे तक्रार दाखल केली होती. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर अखेर मुलुंड मधील मशिदींच्या अनधिकृत भोंग्यावर कारवाई करण्यात आली आहे. मशिदींवरील सर्व अनधिकृत भोंगे मुलुंड पोलिसांनी खाली उतरवले आहेत.

किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत म्हटले, ‘भोंगा मुक्त मुलुंड’, अनधिकृत भोंगे मशिदीवरून खाली उतरवण्यासंबंधी आपण संकल्प केला होता. महाराष्ट्रात भोंग्याचा गोंगाट व महाराष्ट्र ध्वनिप्रदूषण मुक्त करण्यासंबंधात मुलुंड पोलीसांनी पुढाकार घेतला आहे. मुलुंड मधील सगळ्या मशिदींवरून आता भोंगे खाली उतरवण्यात आले आहेत. या कारवाईसाठी त्यांनी मुलुंड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा : 

पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत नोकरी

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड कसुरीला दरदरून घाम फुटला!

पाकिस्तानचा शेअर बाजार अडीच हजारांनी पडला!

आम्ही एनडीएसोबत होतो आणि पुढेही राहू

दरम्यान, ध्वनी प्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास ताकीद देणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते. तसेच तक्रारदाराचे नाव जाहीर न करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशांतर्गत जर ध्वनीप्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास तर पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा तक्रार आल्यास रुपये ५,००० चा दंड लावा, पुन्हा तक्रार आल्यास भोंगा जप्त करण्यास सांगितले आहे.

पाकसोबत गंगाजमनी तहजीबवाल्यांचा इलाज करा... | Dinesh Kanji | Robert Vadra | Pahalgam Attack |

Exit mobile version