कोविडची लस ही ‘भाजपा’ ची लस…अखिलेशचा अजब तर्क!
देशभरात आता कोविडची लस देण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यावर भाजपाने शिक्कामोर्तब सुद्धा केले आहे. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपण ही लस घेणार नाही असे जाहीर केले आहे. कारण कोवीड लस भाजपाची लस आहे. त्यामुळे या लसीवर आपला विश्वास नसल्याचे त्यांनी सांगतले आहे.
अखिलेश यांनी आपण २०२२ साली उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर कोविडची लस राज्यभरात मोफत देऊ असे जाहीर केले आहे. भाजपा देशात वाढलेली महागाई, भष्टाचार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसचं आपली अकार्यक्षमता कोरोनाच्या आड लपवत आहे. असा आरोप सुद्धा यादव यांनी केला आहे. तसचं शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार निष्ठुर असल्याची टिकाही अखिलेशने केली आहे.
हा तर वैज्ञानिकांचा अपमान…
अखिलेश यादव यांच्या टीकेला भाजप नेते आणि उत्तर प्रदशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी उत्तर दिले आहे. मौर्य यांनी ट्विट करत यादव यांच्यावर पलटवार केला आहे. “अखिलेश यादव यांना लसीवर विश्वास नाही आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला अखिलेश यादव यांच्यावर विश्वास नाही. अखिलेश यादव यांनी लसीवर शंका उपस्थित करणे हा देशातील चिकित्सक आणि वैज्ञानिकांचा अपमान आहे. यासाठी यादव यांनी माफी मागितली पाहिजे ” असे मौर्य यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/kpmaurya1/status/1345316152608579585?s=20