राज कुंद्रा यांची संपत्ती जप्त, शिल्पा शेट्टीचा फ्लॅटही घेतला ताब्यात!

पॉन्झी स्कॅम प्रकरणी ईडीची कारवाई 

राज कुंद्रा यांची संपत्ती जप्त, शिल्पा शेट्टीचा फ्लॅटही घेतला ताब्यात!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे.अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई शाखेने पीएमएलए कायद्यांतर्गत राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला जुहू येथील फ्लॅटचा समावेश आहे.

बिटकॉइन पॉन्झी स्कॅम प्रकरणी राज कुंद्रा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.राज कुंद्राच्या जप्त केलेल्या संपत्तीमध्ये त्यांचा पुण्यातील बंगला आणि काही इक्विटी शेअर्स देखील आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या होत्या, त्याआधारे ईडीने तपास सुरू केला.आरोपींनी बिटकॉइन्सच्या रूपात १० टक्के दरमहा परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन मोठ्या प्रमाणात लोकांकडून निधी गोळा केल्याचा आरोप आहे.गोळा केलेल्या बिटकॉइन्सचा वापर बिटकॉइन खाणकामासाठी केला जाणार होता आणि गुंतवणूकदारांना क्रिप्टो मालमत्तेत मोठा परतावा मिळणार होता. परंतु प्रवर्तकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

हे ही वाचा:

लहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!

गुगलने २८ कर्मच्याऱ्याना कामावरून कमी केले

‘मुंबई इंडियन्सबरोबरच गुजरात टायटन्सलाही बुडवले’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आणखी दोन संशयित अटकेत

ईडीने केलेल्या तपासणीनुसार, राज कुंद्राला युक्रेनमध्ये बिटकॉइन मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेनबिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याचा मास्टरमाईंड आणि प्रमोटर अमित भारद्वाजकडून २८५ बिटकॉइन्स मिळाले होते. हे बिटकॉइन्स अमित भारद्वाजने लोकांना फसवून जमा केलेल्या पैशांमधून घेतले होते. मात्र दोघांमध्ये हा करार झाला नसल्यामुळे, राज कुंद्रा यांच्याकडे २८५ बिटकॉइन्स त्यांच्याकडे अजूनही आहेत आणि त्याची किंमत १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

यापूर्वी या प्रकरणात अनेक शोध मोहिम राबवून तिघांना अटक करण्यात आली.अटक केलेल्यांमध्ये सिम्पी भारद्वाज (१७ डिसेंबर २०२३), नितीन गौर (२९ डिसेंबर २०२३) आणि निखिल महाजन (१६ जानेवारी २०२३) यांचा समावेश आहे.हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.मुख्य आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज हे अद्याप फरार आहेत.याप्रकरणी ईडीने यापूर्वी ६९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणात ११ जून २०१९ रोजी फिर्यादीने फिर्याद दाखल केली होती.नंतर यावर्षी १४ फेब्रुवारीला त्याने सप्लिमेंट्री तक्रार दाखल केल्यावर विशेष पीएमएलए न्यायालयाने या तक्रारींची दखल घेतली होती.

Exit mobile version