शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

शापूरजी पालनजी उद्योगसमुहाचे प्रमुख पद्मभूषण पालनजी मिस्त्री यांचे निधन

अब्जाधीश आणि शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रमुख पालनजी मिस्त्री यांचे सोमवार,२७ जून रोजी रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पालनजी यांना २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

बांधकाम विभागातील शापूरजी पालनजी ही एक मोठी कंपनी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. पालनजी मिस्त्री यांच्या निधनाच्या बातमीने दुःख झाले. त्यांनी वाणिज्य आणि उद्योग जगात अतुलनीय योगदान दिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, एका युगाचा अंत झाला असे ट्विट त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

२२ जून ते २४ जून कालावधीत मंजूर प्रस्तावांचा तपशील देण्याचे माविआला आदेश

अग्निपथ योजनेला ‘वायू’गतीने अर्ज; ९४ हजार युवक इच्छुक

धक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह

कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; २० जण अडकले

१८६५ मध्ये शापूरजी पालनजी समूहाची स्थापना झाली. भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक कंपन्यांपैकी एक आहे. २०१६ मध्ये पालनजी मिस्त्री यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. साधी राहणीमान असल्यामुळे त्यांना “बॉम्बे हाऊसचे फॅंटम” म्हणून देखील ओळखले जात होते. त्यांनी वाणिज्य आणि उद्योग जगतात अतुलनीय योगदान दिले आहे. फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार , त्यांची एकूण संपत्ती १३ अब्ज डॉलरहून अधिक आहे. अब्जाधीशांच्या यादीत जगात त्यांचा १४३ व्या क्रमांक लागतो.

Exit mobile version