कोकणवासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण म्हणजे होळी आणि गणेशोत्सव. या उत्सवासाठी आपआपल्या गावी जाण्यासाठी कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांच्यातर्फे प्रती प्रवाशी दोनशे रुपयांमध्ये एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. सोमवारी सायंकाळी दहा बसेस रवाना करण्यात आल्या. अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात कोकणवासियांनी “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष करत गावी प्रस्थान केले.
गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे महाविकास आघाडीने जे निर्बंध घातले होते. या कारणाने गेली दोन वर्ष मुंबईकर गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाऊ शकला नव्हता. यंदा हे निर्बंध भाजपा-सेनेच्या सरकारने पूर्णपणे उठवून निर्बंधमुक्त सण साजरे करा, असे जाहीर केले होते.
गणेशोत्सव म्हणजे कोकणात दसरा दिवाळीपेक्षा मोठा सण. सालाबादप्रमाणे माझ्या कांदिवली पूर्व मतदासंघांतील कोकणवासीयांसाठी नाममात्र दरात आज सायंकाळी गणेशोत्सव स्पेशल दहा एसटी बस रवाना करण्यात आल्या. गणपती बाप्पा मोरया. pic.twitter.com/2El6gzSaXw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 29, 2022
वर्षातील महत्त्वाचा असलेला गणेशोत्सव सण गावी साजरा करता यावा. यासाठी अत्यंत कमी दरामध्ये ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोईसर येथून सावंतवाडी, कणकवली, गुहागर, राजापूर, देवगड, कत्नागिरी, महाड या ठिकाणी गणेशभक्त रवाना झाले.
हे ही वाचा:
मंद घोडा, जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे बाराटक्के
गणेशभक्तांनो या पुलावरून जाताना घ्या काळजी
याबाबत बोलताना आमदार अतुल भातखळकर म्हणाले, कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष कोणताही सण, उत्सव साजरा करता आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने यंदा सण, उत्सवावरील निर्बंध हटवल्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. माझ्या कांदिवली पूर्व विधानसभेत राहणाऱ्या कोकणवासियांसाठी ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने सर्व गणेशभक्त समाधानी आहेत.
गणेशोत्सव काळात एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल झालेले दिसते. आरक्षण सहा महिने अगोदर फूल झालेले असते. प्रवाशांची ही गर्दी लक्षात घेऊन गणपतीसाठी खास एसटी बसेस गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी पोहोचतात. वाढती गर्दी लक्षात घेता गाड्यांची संख्या अपूरी पडते. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी या बसेसची व्यवस्था करून गणपतीभक्तांना दिलासा दिला आहे.