बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

बस दरीत कोसळली, ६ जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये चंदनवाडीत आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली असून, भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आयटीबीपीचे सहा जवान शहीद झाले आहेत. तर ३२ जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसमधून ३९ जवान प्रवास करत होते.

३९ जवानांपैकी ३७ आयटीबीपीचे तर दोन जम्मू-काश्मीर पोलिसांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या बसमध्ये जवान प्रवास करत होते ती सिव्हिल बस होती आणि अचानक ब्रेक निकामी झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. वातावरण बदलामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेससाठी गुगलवर गर्दी

शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान

७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज

भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद

अमरनाथ यात्रेसाठी या भागाच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात आले होते. जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. पहलगामच्या फ्रिसलानमध्ये ही बस नदीत पडली आहे. अपघात एवढा भीषण होता की, बस चंदनवाडी येथे सुमारे २०० फूट खाली दरीत कोसळसली. त्यानंतर या बसचा स्फोट झाला. त्यामुळे सहा जवान शहीद झाले असून, ३२ जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु आहे. या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झाला.

Exit mobile version