टँकरवर बस धडकून भीषण आग! ११ जणांचा मृत्यू

टँकरवर बस धडकून भीषण आग! ११ जणांचा मृत्यू

बाडमेर जोधपूर महामार्गावर एक खासगी बस आणि टँकर यांच्यात धडक झाली आहे. या धडकेतून बसला आग लागली असून या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्रार्थमिक माहिती पुढे आली आहे. तर तब्बल २२ लोक हे या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बुधवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. बस मधील एका प्रवाशाच्या सांगण्यानुसार, सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी ही खासगी बस राजस्थानमधील बलोतरा येथून निघाली. बाडमेर जोधपूर हायवे वरून ही बस जात होती. यावेळी चुकीच्या बाजूने एक टँकर भरधाव वेगात येत होता. यावेळी या टँकरने बसवर जोरदार धडक दिली.

या धडकीनंतर क्षणार्धात बसला आग लागली. या भयंकर आगीत अवघ्या काही मिनिटांत ही बस जळून खाक झाली. या अपघाताची माहिती कळताच स्थानिक पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. तर अनेक प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी हे देखील घटनास्थळी पोहोचले. या अपघातात आत्तापर्यंत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २२ जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार आहेत. तर जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने या बाबत ट्विट करत घोषणा केली आहे.

Exit mobile version