29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषसमृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावरील दुर्दैवी घटना

Google News Follow

Related

समृध्दी महामार्गवर एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर बसने पेट घेतल्याने बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची असून नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. बसमध्ये एकूण ३३ प्रवास होते. आठ प्रवाशांना सुदैवाने गाडीने पेट घ्यायच्या आत बाहेर पडता आले. मात्र, २५ प्रवाशी आत अडकून पडल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

बस क्रमांक एमएच २९ बी ई १८१९ ही ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं फार कमी लोकांना बस बाहेर पडण्याची संधी मिळाली. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे. त्यामुळे डिझेल टॅंक फुटली असावी किंवा डिझेल टॅंक मधून इंजिनकडे सप्लाय होणारा डिझेल पाईप फुटला असावा, त्यामुळेचं बसने पेट घेतला असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

जे लोक बचावले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे लोक काचेची खिडकी हाताने फोडून बाहेर निघू शकले त्यांचा जीव वाचला आहे. बसमधून २५ मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले आहेत. जे मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख पटवणे अडचणीचे होत आहे.

हे ही वाचा:

भारत- पाक सामन्यासाठी हॉटेलचे दर गगनाला भिडले

…हा तर स्वतःचे काळे कारनामे झाकण्यासाठी मुंबई महापालिकेवर मोर्चा

भारतातल्या परिचारिका का निवड करत आहेत जर्मनीची?

ठरलं… मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निघाला

मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना मदत

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींवर तातडीने उपचार करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा