इंदूरहून महाराष्ट्रात येणारी बस नर्मदेत कोसळली; १३ मृत्यू

इंदूरहून महाराष्ट्रात येणारी बस नर्मदेत कोसळली; १३ मृत्यू

मध्य प्रदेशातील धारमध्ये भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून अमळनेरला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या एसटीच्या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मध्य प्रदेशच्या धारमध्ये कठडा तोडून एसटी नर्मदा नदीत कोसळली.

बस सकाळी ७.३० ला इंदूरहुन निघाली होती. या बसमध्ये अंदाजे ५० ते ६० प्रवासी होते. यामध्ये १३ लहान मुलांचा समावेश होता. चालक आणि वाहकासह आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बसचालक चंद्रकांत एकनाथ पाटील आणि वाहक प्रकाश श्रवण चौधरी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. यातील पाच मृतदेहांची ओळख पटली आहे. तसेच आतापर्यंत २५ ते २७ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एसटी इंदूरहून अमळनेरला येत होती. त्यावेळी समोरून दुचाकीस्वार भरधाव वेगाने येत होता. त्याला वाचवण्यासाठी चालकाने बस बाजूला केली असता काही तांत्रिक कारणामुळे बस थेट कठडा तोडून नर्मदा नदीत पडली आहे.

नदीत कोसळल्या बसला बाहेर काढण्यात आली असून, त्या बसचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत. अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने हेल्पलाईन नंबर दिला आहे. ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन असल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा:

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

दरम्यान, एसटी बसचा अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले असून, मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भाजपा आमदार गिरीश महाजन इंदूरला रवाना झाले आहेत.

Exit mobile version