27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषडोंबिवलीहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात; पाच भाविकांचा मृत्यू

डोंबिवलीहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात; पाच भाविकांचा मृत्यू

अपघातात पाच जण गंभीर जखमी तर ४२ जणांना किरकोळ दुखापत

Google News Follow

Related

मुंबई – पुणे महामार्गावर सोमवार, १५ जुलै रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. डोंबिवलीहून पंढरपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस ट्रॅक्टरला आदळल्याने दरीत कोसळून हा अपघात झाला. या बसमध्ये तेव्हा ५४ प्रवासी होते. अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुधवार, १७ जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यासाठी हे भाविक विठ्ठरुयाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे जात होते. डोंबिवलीमधील केळझर गावातून हे सर्व भाविक बसने निघाले होते. यावेळी पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस साधारण २० ते ३० फूट फूट खाली दरीत कोसळली. यामुळे पाच भाविकांचा मृत्यू झाला तर पाच जखमींची परिस्थिती गंभीर आहे, शिवाय ४२ जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनाही रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, “सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात झाला. एका खासगी बसमधून ५४ जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या ४२ जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.”

हे ही वाचा:

विशाळगडावरील दर्ग्यावर कारवाई करा, शस्त्रसाठा जप्त करा

मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा

यासिन भटकळ विशाळगडावर राहिला, हेच का तुमचे पुरोगामित्व?

‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं आणि सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केलं. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आला कसा? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा