बुमराह सराव शिबीराला अजूनही अनुपस्थित, मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय?

बुमराह सराव शिबीराला अजूनही अनुपस्थित, मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स २४ मार्चला सामना खेळणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सध्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स अहमदाबादमध्ये सराव करत आहे. पण आतापर्यंत जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू शिबिरात सहभागी झालेले नाहीत. यानंतर मुंबई इंडियन्स संघात सर्व काही आलबेल आहे का, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची माळ घातल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी खरपूस समाचार घेतला होता.

जसप्रीत बुमराह संघात कधी सामील होणार?


भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली. जसप्रीत बुमराह त्या भारतीय संघाचा भाग होता. त्यामुळे जसप्रीत बुमराह २१ मार्च रोजी थेट अहमदाबादला पोहोचणार आहे, असे बोलले जात आहे. जिथे तो मुंबई इंडियन्स संघात सामील होईल. मुंबई इंडियन्सचा संघ १२ मार्चपासून अहमदाबादमध्ये सराव करत आहे.

हेही वाचा :

प्युअर व्हेज फ्लीट सेवेच्या ‘टी-शर्ट’ वरून झोमॅटोचा युटर्न!

सिद्धू मूसेवाला याचे वडील म्हणतात, पंजाब सरकारकडून होतोय छळ

हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण

आयपीएल पहिल्या सामन्यात सूर्या तळपणार नाही?

मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याची कर्णधारपदी निवड केली आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या कर्णधारपदी विराजमान होणार आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पंड्याला विकत घेतले. त्याचवेळी त्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएल विजेतेपदाचा विक्रम केला आहे. पण त्याच्याऐवजी हार्दिक पंड्याच्या कर्णधारपद बहाल केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर अनेक वरिष्ठ खेळाडू खूश नसल्याचे बोलले जात होते.

Exit mobile version