वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल २०२५ सिझनमधून मुंबई इंडियन्ससाठी सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. बुमराह अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. जानेवारीपासून तो मैदानाबाहेर आहे. बुमराह एप्रिलच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या संघासोबत जोडला जाऊ शकतो. परंतु मार्चमध्ये एमआयला तीन सामने खेळायचे आहेत. बुमराह संघासोबत जाऊ शकेल, जेव्हा एनसीएच्या वैद्यकीय टीमकडून त्याला तंदुरुस्त घोषित केले जाईल.
बुमराह आपल्या पाठीच्या खालच्या भागातील ताणदुखीमधून सावरत आहेत. बुमराह ४ जानेवारी रोजी सिडनीमध्ये झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या अंतिम कसोटीत त्याला दुखापत झाली होती. बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावे लागले होते. भारताने चॅम्पियन ट्रॉफी आपल्या खिशात टाकली आहे. मार्च २०२३ मध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रथमच पुन्हा पाठीच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला होता.
भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी जानेवारीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा करताना सांगितले होते की, बुमराहला बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने किमान पाच आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीला सुरू झाली होती. त्यामुळे बुमराहला भारताच्या तात्पुरत्या संघात स्थान देण्यात आले होते. तो फेब्रुवारीच्या सुरुवातीला बेंगळुरूला तपासणीसाठी गेला होता. परंतु अंतिम संघात त्याला समाविष्ट केले नाही.
बुमराह किती सामन्यासाठी मुकेल आणि त्यांच्या पुनरागमनाची निश्चित तारीख काय असेल, याची अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
हेही वाचा :
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा हल्ला; अनेक जवान मारल्याचा दावा!
देशात १९,८२६ किलोमीटर महामार्गाचे बांधकाम पूर्ण
गरिबांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून गुंडांना धडा शिकवा
एमआयचे पहिले दोन सामने बाहेरच्या मैदानावर आहेत. २३ मार्च रोजी चेन्नईमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध, २९ मार्च रोजी ते अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स (जीटी) विरुद्ध खेळतील. एमआयचा पहिला घरचा सामना ३१ मार्च रोजी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्ध होईल. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्यांचे दोन सामने आहेत – ४ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्ध लखनऊमध्ये आणि ७ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) विरुद्ध मुंबईत.
नुकतेच, न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड, जे पूर्वी एमआय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते, त्यांनी चेतावणी दिली की जर बुमराहला पुन्हा त्याच ठिकाणी दुखापत झाली जिथे त्यांनी शस्त्रक्रिया केली होती, तर ती “करिअर समाप्त करणारी” ठरू शकते.