कल्याण रेल्वे स्थानकातून डिटोनेटर्सचा साठा जप्त!

परिसरात एकाच खळबळ, पोलिसांकडून शोध सुरु

कल्याण रेल्वे स्थानकातून डिटोनेटर्सचा साठा जप्त!

कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.कल्याणच्या रेल्वे स्थानकावर स्फोटके आढळल्याची माहिती समोर आली आहे.कल्याण रेल्वे स्थानकाच्या १ नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर ५४ डेटोनेटर सापडले.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.या पराकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आहेत ज्यांचा वापर खाणीसाठी केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या शेजारी डेटोनेटरच्या ५४ कांड्या आढळून आल्या.या डेटोनेटरच्या कांड्या एका बॉक्समध्ये पॅकिंग स्वरूपात प्लॅटफॉर्म नंबर एक च्या शेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा:

भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘आप’चे चंदिगडचे महापौरपद टिकेल काय?

बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!

“जरांगेंनी मराठा कुटुंबांना उद्ध्वस्त केले!”

रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि बॉम्ब शोध पथक दाखल झाले.मिळालेल्या माहितीनुसार, हा एक इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आहे ज्याचा उपयोग खाणीसाठी केला जातो. हे डिटोनेटर्स इथे कुठून पोहोचले याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांना कोणी विसरले की जाणूनबुजून येथे सोडले, याचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या पथकाने या डेटोनेटरच्या कांड्या ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

पोलिसांकडून रेल्वे स्थानक परिसरातील एन्ट्री आणि एक्झिट ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.दरम्यान, डेटोनेटरच्या या कांड्या कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म जवळ सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version