छत्तीसगढच्या भिलाईमध्ये मशिदीच्या बेकादेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. अवैधरीत्या बांधकाम करण्यात आलेल्या मशिदीच्या कमानीवर (प्रवेशद्वार) तोडक कारवाई करत उध्वस्त करण्यात आले आहे. प्रशासनाकडून सोमवारी (९ सप्टेंबर) मशीद संकुलाची जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बुलडोजरची कारवाई करण्यात आली. अवैधरीत्या बांधण्यात आलेल्या २५-३० दुकानांवर बुलडोजर चालवण्यात आला. तसेच या ठिकाणी विवाह हॉल बांधून व्यावसायिक उपयोग केला जात होता, प्रशासनाने तोही तोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. त्यावेळी विशेष क्षेत्र विकास प्राधिकरणच्या (SADA) कार्यकाळात ‘करबला मशीद समिती’ला एक जमिनीचा तुकडा देण्यात आला होता. मात्र, करबला मशीद समितीने हळूहळू बेकादेशीररित्या अडीच एकर जमिनीवर ताबा मिळविला. त्यानंतर भिलाई महानगरपालिकाने बेकायदा बांधकाम हटविण्याच्या अनेक नोटीसा मशीद समितीला पाठवल्या होत्या. नोटीसला मशीद समितीकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. अखेर आज उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेकादेशीर बांधकामावर बुलडोजरची कारवाई केली.
सरकारी मालकीच्या अडीच एकर जमिनीवर अवैधरीत्या दुकाने, घरे, लग्न हॉल बांधून सर्व भाडेतत्वावर देण्यात आले होते. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने समितीने विरोध केला नाही, तसेच समितीवर सभासद कालांतराने बदलत असतात, ३० वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असल्याने याबाबत काही माहिती नसल्याचे सांगून चालू समितीच्या सभासदांनी कारवाईला विरोध केला नाही.
हे ही वाचा :
हिंदूद्वेष हरोनी सुबुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा…
हरियाणामध्ये आप, काँग्रेसच्या युतीचे बिनसले; आपकडून उमेदवारांची यादी जाहीर
उत्तर प्रदेशात मशिदीवर रातोरात उभ्या राहिल्या तीन मिनार !
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा !