जैसलमेर : पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू निर्वासित कुटुंबाची घरे बुलडोझरने पाडण्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील जैसलमर जिल्ह्यात अमर सागर भागात घडला. तेथील जिल्ह्याधिकारी टीना डाबी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. बुलडोझरच्या साहाय्याने ही घरे उद्ध्वस्त केल्याने ऐन उन्हाळ्यात घरातील महिला, लहान मुलांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या अराजक माजले आहे. दहशतवादामुळे अनेक कुटुंब निर्वासित झाली आहेत. या प्रकाराला कंटाळून जैसलमेर भागात वास्तव्यास आलेल्या हिंदू कुटुंबांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. या कारवाईनंतर ही कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांचे प्रांपचिक साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले आहे. घरेच उद्ध्वस्त होणार असल्याने कुटूंबातील महिलांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधाला न जुमानता जिल्हाधिकारी डाबी यांच्या आदेशाने घरे पाडण्यात आली आहेत.
डोळ्यादेखत घरे उद्ध्वस्त होताना महिलांकडून टाहो फोडला जात होता. मात्र प्रशासनाला माणुसकीचा पाझर फुटला नाही. त्यांचा टाहो ऐकणारे येथे कोणी नव्हते. त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता प्रशासन बुलडोझर चालवत राहिले. सुमारे ५० कच्ची घरे पाडण्यात आली आहेत. या कारवाईमुळे १५० पेक्षा जास्त जण बेघर झाले आहेत.
हेही वाचा :
अदानी उद्योग समूहाला सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची क्लीन चिट !
पेसमेकर बसवलेल्या महिलेचा एव्हरेस्ट सर करताना मृत्यू !
नड्डा यांचा ‘पीए’ असल्याचे सांगत आमदाराकडून पैशांची मागणी !
अदानी उद्योग समूहाला सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची क्लीन चिट !
अमर सागर या भागात असलेल्या एका तलावाजवळ ही घरे बांधण्यात आली होती. पाकिस्तानमध्ये ज्या कुटुंबांना त्रास देण्यात आला होता, अशी हिंदू कुटुंबे येथे वास्तव्य करत होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे.