मुंबईतील मीरा रोड येथील बेकादेशीर बांधकामे उध्वस्त करण्यात आली आहेत.पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मोठ्या तुकडीसह मीरा रोड येथील बेकादेशीर बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रविवारी संध्याकाळी मीरारोड येथे हिंसाचार झाला होता. या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या अनधिकृत बांधकामांवर हा हातोडा फिरविण्यात आला. फडणवीसांनी या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले होते.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.देशभरातून दिवाळी साजरी करण्यात आली.देशभरातील भाविकांकडून रॅली काढून उत्सव साजरा करण्यात आला.एकीकडे सोहळ्याची तयारी सुरु असताना दुसरीकडे मुंबईच्या मीरारोडमध्ये दोन गटात दगडफेक झाल्याचे निदर्शनास आले.रविवारी मिरारोडच्या नयानगर भागात ही घटना घडली.या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले.या व्हिडिओमध्ये दोन गट एकमेकांवर दगडफेक करत असल्याचे दिसले.
हे ही वाचा:
श्री रामभक्तांसाठी बनवलेल्या ‘हलवा’ची एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’च्या यादीतून वगळलेल्या सात खेळांचा पुन्हा समावेश करा
आसाम: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवर पोलिसांचा लाठीमार!
अयोध्या: रामलल्लाच्या दर्शनासाठी तीन लाख भाविकांची गर्दी!
२३ जानेवारी मंगळवारी सकाळी हजारो पोलिसांचा ताफा मीरारोड भागात दाखल झाला.पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मीरारोड परिसरातील अनधिकृत बांधकाम उद्वस्त करण्यात आले.महापालिकेने बुलडोजर चालवून परिसरातील अवैध बांधकाम पाडून टाकले.
दरम्यान, रविवारी मीरारोडच्या नया नगर परिसरातून ‘श्री राम शोभा यात्रा’ जात असताना जमावाकडून दगडफेक करण्यात आली, जमावाकडून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, लोकांना मारहाण करण्यात आली, गाड्यांवरील भगवे झेंडे तोडण्यात आले.या घटनेनंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी पोलिसांनी डझनभर लोकांना अटक केली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दाखल घेतली.त्यांनी ट्विट करत लिहिले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला” कठोर शिक्षा केली जाईल.आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.