बुलढाण्यातील जळगाव जामोद शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना घडली आहे. जामोद शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक करण्यात आली. काल (१७ सप्टेंबर) रात्री ८.३० च्या सुमारास गणपतीचे विसर्जन करण्यासाठी निघलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली. चौभारा, वायली वेस या ठिकाणी ही घटना घडली. सुमारे अर्धा तास ही दगडफेक सुरु होती. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले आहेत. संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दगडफेक झालेल्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
आरोपींना अटक करत नाही तो पर्यंत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार नसल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
लेबनॉनमध्ये स्फोट झालेले तैवान निर्मित पेजर्स युरोपियन कंपनीने बनवले
डोनाल्ड ट्रम्प घेणार पंतप्रधान मोदींची भेट; मोदी ‘फँटास्टिक नेते’ म्हणत काढले गौरवोद्गार!
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट
जम्मू- काश्मीर: १० वर्षांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात