23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषभिवंडीत इमारत कोसळली, ४० जण अडकल्याची भीती

भिवंडीत इमारत कोसळली, ४० जण अडकल्याची भीती

अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना

Google News Follow

Related

भिवंडीतील कैलासनगर (वळपाडा) भागात शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तीन माजली इमारत पत्यासारखी अचानक कोसळली. या दुर्घटनेत ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. इमारत दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे अद्याप तरी कोणतेही वृत्त नाही.

स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन विभागाला फोन करून दुर्घटनेची माहिती दिली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफची टीम, पोलिस यांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. भिवंडीच्या वलपाडा परिसरात वर्धमान कंपाउंडमध्ये तळमजला अधिक दोन अशी तीन माजली इमारत आहे. दुपारी वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्ठा आवाज झाला आणि ही इमारत धाडकन कोसळली. सुरुवातीला स्थानिक लोकांना कसला आवाज झाला ते कळले नाही. त्यानंतर पुन्हा एक आवाज होत ही इमारत पूर्णत: जमीनदोस्त झाली. सगळीकडे मातीच धुराळा उडाला. इमारत पडल्याचे समजताक स्थानिक लोकांनी इमारतीच्या दिशेने धाव घेतली.

ही इमारत जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. या  इमारतीच्या वरच्या तिन्ही मजल्यावर लोक राहत होते. इमारतीच्या तळमजल्यावर गोदाम आहे. घटना घडली त्यावेळी गोदामात ३० ते ३५ कामगार काम करत होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तीन ते चार कुटुंब राहत होते. इमारत पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. इमारत दुर्घटनेनंतर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले होते ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा वाचवा वाचवा असा आक्रोश सुरु होता. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली या कुटुंबासमवेत हे कामगार असे मिळून ३० ते ४० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

नारायण कार्तिकेयनला गवसला उद्योगाचा ‘फॉर्म्युला’; दोन वर्षांत १७८ कोटींचा उद्योग

भारतात येण्यासाठी आता दुबईत अडकलेल्या अभिनेत्रीला हवाय पासपोर्ट

निवासी, अनिवासी मालमत्ता विकून मिळाला १० वर्षातला विक्रमी महसूल

युक्रेनच्या अनेक शहरांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांत २५ जणांचा मृत्यू

स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मदत कार्य सुरु केले. सुरुवातीला स्थानिकांचा ढिगारा उपसून जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत सुरु केली. थोड्याच वेळात अग्निशमन दल, एनडीआरएफच्या तुकडी पोहचून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले . सध्या ढिगारा उपसण्याचे काम सुरु असून अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किती जखमी झाले? किती दगावले? याची माहिती मिळू शकली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा