नवी मुंबईत इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती, दोघांची सुटका

एक जण बेपत्ता; प्रशासनाकडून शोधकार्य सुरू

नवी मुंबईत इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भीती, दोघांची सुटका

नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी इमारतीमधील रहिवासी झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीजवळ उभ्या असलेल्या दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्याच्या माहितीनुसार दोन जणांची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर एक जण बेपत्ता आहे. अजूनही शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.

इंदिरा निवास असे या इमारतीचे नाव होते. इंदिरा निवासमध्ये एकूण १३ सदनिका होत्या. त्यात २६ कुटुंब राहत असल्याची माहिती समोर आली आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ, मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. इमारत का आणि कोणत्या कारणांमुळे कोसळली याचा तपास केला जाणार आहे.

माध्यमांशी बोलताना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणाले, “ही इमारत पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोसळली. ही तीन मजली इमारत होती. दरम्यान ही १० वर्षे जुनी इमारत होती. त्यामुळे या दुर्घटनेत जो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल,” असं आयुक्त म्हणाले.

हे ही वाचा:

गिरगावची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी ‘हिंदू मंदिर बचाव अभियाना’त सहभागी होण्याचे आवाहन

पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश

पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!

बेलापूर सेक्टर १९ शहाबाज गावातील इंदिरा निवास मधील तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत २०१३ मध्ये बांधण्यात आली होती. कोसळलेल्या इमारतीमध्ये तीन गाळे आणि १३ फ्लॅट्स होते. पहाटे अचानक इमारतीला हादरा बसला आणि इमारत कोसळली.

Exit mobile version