कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; २० जण अडकले

कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; २० जण अडकले

मुंबईतील कुर्ला येथे इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुर्ल्यातील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत काल, २७ जून रोजी रात्री ११.३० च्या सुमारास कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक अडकले असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी हजर असून बचाव कार्यात आतापर्यंत पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. तरीही या इमारतींमध्ये ८ ते १० कुटुंबे राहत होती. हे सर्व भाडेकरू असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय”

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

एकनाथ शिंदे गटावरील अपात्रतेची टांगती तलवार तूर्तास दूर

मुडदे येतील… यावरून संजय राऊत लक्ष्य

कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, जेव्हा जेव्हा महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात येईल तेव्हा त्वरीत जागा रिकामी करा, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत.

Exit mobile version