23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषगोवंडीत इमारत कोसळून तीन जणांचा बळी

गोवंडीत इमारत कोसळून तीन जणांचा बळी

Google News Follow

Related

मुंबईतील गोवंडी भागात दोनमजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमाराम घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी आहेत. शिवाजी नगर, गोवंडी परिसरात १+१ स्ट्रक्चर असलेली इमारत पहाटे पाच वाजता कोसळली.जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी महानगर पालिकेचे आपत्कालीन पथक दाखल झाले आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडीमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. यामुळं अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ जणांना मृत्यू झाला होता. चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारकडून ‘ही’ नवी सुधारणा

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?

लडाखच्या विकासासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोकणच्या मदतीला दिल्ली तत्पर

घर कोसळण्याचा आवाज आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या आक्रोशामुळे जागे झालेल्या शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतकार्यास सुरुवात केली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनाही तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. मात्र, पाऊस आणि अंधारामुळे मदत कार्यात व्यत्यय येत होता. तसेच हे घर दाटीवाटीच्या भागात असल्यानेही मदतकार्यात अडथळा येत होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा